चिपळूण : (ओंकार रेळेकर) चिपळूण शहरानजीक कापसाळ गावी निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या एसीबी इंटरनॅशनल स्कूल, एसीबी प्ले स्कूल सावर्डे,पाग आणि मार्कंडी या शाळांचे दोन दिवस वार्षिक स्नेहसंमेलन नुकतेच शाळेच्या भव्य सभागृहात नुकतेच संपन्न झाले.यावेळी स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा आविष्कार पाहण्यास मिळाला त्याला पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून येत होते.
देशभक्तीपर गीत, कोळी गीत, समूह गीत, हिंदी व मराठी नवीन व जुनी गाणी यांच्या तालावर बाल कलाकारांनी चांगलाच ठेका धरला होता.चिमुकली मुले आपल्यातील कला गुण सादर करीत असतांना त्यांच्या उपस्थित पालकांमध्ये एकच उत्साह संचारला होता. उद्योजक चंद्रकांत भोजने ,एसीबी इंटरनॅशनल स्कूल चेअरमन सौ .सायली अमोल भोजने, संचालक ऍड अमोल चंद्रकांत भोजने यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या वार्षिक स्नेहसंमेलनाला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला .एसीबी इंटरनॅशनल स्कूल मध्ये इयत्ता आठवी मध्ये शिकणाऱ्या अनन्या अडविलकर हिने सादर केलेले कथक नृत्य लक्षवेधि ठरले .उद्योजक चंद्रकांत भोजने,इंडियन सायंटिफिक एज्युकेशन एज्युकेशन सोसायटी व्हॉइस चेअरमन सौ. सुवर्णा चंद्रकांत भोजने ,संचालिका सौ पूजा खताते, संचालिका भाग्यश्री भोजने, सौ .सायली भोजने ,अँड. अमोल भोजने,डॉ. शेखर पालकर,लायन्स क्लब झोनल प्रेसिडेंट चेतना होमकर ,महिला सवरक्षण अधिकारी माधवी जाधव,लायन्स क्लब महिला अध्यक्ष तेजल पेढांबकर,
उद्योजक प्रसन्न अडविलकर, चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, आर्किटेक्ट दिलीप देसाई,अँड. अजय कांबळे,मुख्याध्यापक राकेश भुरण आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयशा सरगुरू, पर्यवेक्षक मुकुंद ठसाळे यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी
शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी विशेष मेहनत घेतली.नर्सरी ,ज्युनिअर केजी, सिनियर केजी ,पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांनी डान्स आणि वक्तृत्व स्पर्धेतून आपल्यातील कलागुण सादर केले.
फोटो : चंद्रकांत भोजने यांचा सत्कार करताना डॉ. शेखर पालकर यांच्या सोबत मान्यवर छायाचित्रा दिसत (छाया : ओंकार रेळेकर)

▶️ *राजस्थान A-1 मार्बल आणि ग्रेनाईट स्वस्त आणि मस्त कोल्हापूर दरात रत्नागिरी येथे उपलब्ध.*
▶️ *कोणते मार्बल आणि कोणते ग्रॅनाईट वापरायचे प्रश्न पडलाय? आमच्या दालनात तुम्हाला पाहायला मिळतील असंख्य व्हरायटीज…*
*सेलस्वस्तसेल*
▶️ *_मार्बल, ग्रेनाईट, हॅण्डीक्राफ्ट, फ्लोअर बाथरूम, किचन टाईल्स, मूर्तीचे भरपूर व्हरायटी_*
*➡️ राजस्थान मार्बल अँड ग्रेनाईट*
▶️ *स्वप्नातील घर (वास्तू )साकारताय तर भेट द्याच..*
▶️ *रत्नागिरी – कोल्हापूर हायवे, आकाशवाणी केंद्रसमोर, खेडशी, रत्नागिरी*
* डोनर जैन*
*8209894117*