चिपळूण : (ओंकार रेळेकर ) शहरातील पवन तलाव मैदानावर चार दिवस रंगलेल्या आणि अंतिम सामन्यापर्यंत अटीतटीच्या झालेल्या खासदार चषक क्रिकेट स्पर्धेचे दोन लाखांचे विजेतेपदाचे पारितोषिक तिरुपती सावर्डे संघाने पटाकविले, तर एक लाखांचे उपविजेतेपद युवा स्पोर्ट रत्नागिरी संघाने पटकाविले. शिवसेना युवासेना चिपळूण तालुका व शिवसागर क्रीड मंडळ चिपळूण, तालुका ॲथलेटिक्स असोसिएशन चिपळूण यांच्या संयुक्त विद्यामने ही राज्यस्तरीय प्रकाश झोतातील ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा विधानसभा क्षेत्राध्यक्ष, माजी उपनगराध्यक्ष बाळा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली झाली.
शिवसेना, युवासेना व शिवसागर क्रीडा मंडळाने आयोजित केलेली खासदार चषक 2023 राज्यस्तरीय नाईट क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तिरुपती सावर्डेने रविवारी बाजी मारली. युवा स्पोर्ट रत्नागिरीला पराजित करीत तिरुपती सावर्डेने खासदार चषकावर आपले नाव कोरले. त्यांना 2 लाख रुपये रोख बक्षीस व चषक देऊन खासदार विनायक राऊत, शिवसेना सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या हस्ते गौरविण्यात आले, तर उपजेते पदासाठी युवा स्पोर्ट रत्नागिरीला 1 लाख रुपये रोख व चषक देऊन सन्मान करण्यात आला. अंतिम सामन्याचे सामनावीर संजय पाकळे ठरले. स्पर्धेतील उत्कृष्ट बॅटस्मन प्रथमेश पवार, बेस्ट बॉलर म्हणून तिरुपती सावर्डेच्या गुरु याला गौरविण्यात आले. मालिकावीर बहुमान युवा स्पोर्ट रत्नागिरीच्या पार्थने पटकाविला. तो दुचाकीचा मानकरी ठरला.
क्रीडा रसिकांच्या अलोट गर्दीने ही स्पर्धा अक्षरशः गाजली. चिपळूणच्या इतिहासात सर्वात मोठे बक्षिस असलेली नाईट ओव्हर आर्म राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा चिपळूण येथील पवन तलाव मैदानावर खासदार चषक 2023 या नावाने आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे उदघाटन गुरुवारी आ. भास्कर जाधव यांच्या हस्ते झाले आणि सलग 4 दिवस स्पर्धेचे नयनरम्य सामने येथे सुरू होते. स्पर्धेदरम्यान अनेक राजकीय नेते तसेच नामवंत खेळाडूंची उपस्थिती येथे लक्षवेधी ठरली होती. आमदार राजन साळवी, आमदार वैभव नाईक, संजय पडते, विलास चाळके, रोहन बने, नेहा माने अशा सर्वच मान्यंवरांनी स्पर्धेला भेट देऊन आयोजकांचे कौतुक केले. 16 संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्या माध्यमातून राज्यभरातील टेनिसचे नामवंत अशा अनेक खेळाडूंनी आपला खेळ सादर करीत सर्वांची मने जिंकली होती.
विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे अतिशय सुंदर असे नियोजन करण्यात आले होते. देखणे भव्यदिव्य व्यासपीठ त्याचबरोबर मैदानाच्या चारही बाजूला मोठे स्क्रीन, थेट लाईव्ह प्रक्षेपण, तिसऱ्या पंचाची व्यवस्था, प्रेक्षकांसाठी गॅलरी, सर्वत्र भगवे ध्वज आणि उत्तम विद्युत व्यवस्थेमुळे पवन तलाव मैदानाला क्रीडा नगरीचे स्वरूप मिळाले होते. चारही दिवस क्रीडा रसिकांची अलोट गर्दी या स्पर्धेच्या यशस्वीतेची पोचपावती देऊन गेली.
रविवारी उपांत्य फेरीचे दोन सामने व अंतिम सामना खेळवण्यात आला. या वेळी व्यासपीठावर खासदार विनायक राऊत, लोकसभा मतदार संघाचे क्षेत्रप्रमुख रावराणे, सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संजय पडते, लोकसभा मतदारसंघाचे महिला संघटक नेहा माने, संपर्क प्रमुख सुधीर मोरे, सहसंपर्क प्रमुख राजेंद्र महाडिक,ि जल्हाप्रमुख विलास चाळके, सचिन कदम, माजी जि. प. अध्यक्ष रोहन बने, उपजिल्हाप्रमुख प्रतापराव शिंदे, तालुकाप्रमुख विनोद झगडे, शहरप्रमुख उमेश सकपाळ, युवा सेनेचे उमेश खाताते, पार्थ जागुष्टे, यांच्यासह सिंधुदुर्ग व रत्नागिरीतील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
अंतिम सामना तिरुपती सावर्डे विरुद्ध युवा स्पोर्ट रत्नागिरी यांच्यामध्ये मध्यरात्री रंगला.युवा स्पोर्ट रत्नागिरीने प्रथम फलंदाजी करताना 6 षटकात धावांचे लक्ष तिरुपती सावर्डे संघाला दिले होते.हे लक्ष सहज पार करत तिरुपती सावर्डेने खासदार चषक 2023 वर आपले नाव कोरले.क्रीडारसिकांची अभुतपुर्व गर्दीत व मान्यवरांच्या उपस्थितीत खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते 2 लाख रुपये रोख व खासदार चषक देऊन गौरवण्यात आले.तर युवा स्पोर्ट रत्नागिरीला सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक यांच्या हस्ते 1 लाख रुपये रोख व आकर्षक चषक देऊन गौरवण्यात आले.
या स्पर्धेसाठी पंच म्हणून मिलिंक केळकर, गोट्या भोसले, अक्षय कोळंबेकर, रमीज सोलकर यांनी काम पहिले. समालोचन प्रशांत आदवडे, बाबल्या जाधव, इब्राहीम सरगुरोह, तुषार शिंदे यांनी केले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मिथिलेश नरळकर, बंधु कदम, पार्थ जागुष्टे, आबा साडविलकर, युवराज पवार, प्रतिक शिंदे, साहिल शिर्के, साहिल कदम, रोशन आंब्रे, शैलेश शिंदे, निशांत जंगम, प्रशांत मुळ्ये, आकाश कदम, विनित शिंदे, तुषार गुरव, राहुल गुरव, साई कदम,ओंकार गायकवाड, सौरभ कदम, देवेंद्र शिंदे, गणेश शिंदे, विनायक रेडिज, महंमदअली सरगुरोह, श्लोक साडविलकर, समीर खेडेकर, संदीप साडविलकर, नाना काळे, अविनाश नवरत यांच्यासह शिवसेना युवसेना महिला आघाडी चिपळूण तालुका, शिवसागर , चिपळूण अथलाटिकचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी अपार मेहनत घेतली होती.
फोटो :
चिपळूण येथील खासदार चषकाचा मानकरी ठरलेला तिरुपती सावर्डे संघाला गौरवताना खासदार विनायक राऊत,संपर्कप्रमुख सुधीर मोरे,सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडीक जिल्हाप्रमुख सचिन कदम,तालुकाप्रमुख विनोद झगडे व स्पर्धेचे आयोजक बाळा कदम व मान्यवर..
