बातम्या

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण होण गरजेचं – श्री ऋषिनाथ दादा पत्याणे.

प्रतिनिधी : विनायक खानविलकर.

लांजा : तालुक्यातील सापुचेतळ्यासारख्या ग्रामीण भागाच्या मध्यवर्ती ठिकाणी प्रथमेश गोरे , प्रथमेश बोडेकर , विजय जाधव , आकाश गोरे , नरेंद्र पवार गुरुजी या तरुणांनी पुढाकार घेत पंचक्रोशीतील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालय सुरू करत शैक्षणिक उपक्रमांची पुस्तक उपलब्ध करून वाचनालय सुरू केलं आहे. या ग्रंथालयाच उद्घाटन प्रतिष्ठानचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री प्रमिलशेट पत्याणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. आज मोबाईलच्या युगामध्ये तरुण विद्यार्थी वर्गाचा वाचनाकडे कल थोडा कमी झाला आहे आजच्या या युगात तरुण वर्गाचा कथा, कादंबऱ्या , अध्यात्मिक, पौराणिक वाचनाकडे खूपच दुर्लक्ष होत आहे. स्वराज्य प्रतिष्ठान लांजा या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून या ग्रंथालयासाठी अजुन ही काही पुस्तके देण्याचा मानस आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ अभिनेते विनायक खानविलकर यांच्या शुभहस्ते ग्रंथालयासाठी काही पुस्तके प्रथमेश बोडेकर, प्रथमेश गोरे यांच्याकडे सुपूर्त करण्यात आली यावेळी प्रतिष्ठानचे ज्येष्ठ मार्गदर्शक आणि पेण – हमरापुर येथील उद्योजक दिनेश पद्माकर सावंत , मुकुंद केशव चाळके ,कमलाकर बोरकर ,अभय शेट म्हात्रे उपस्थित होते . यावेळी कमलाकर बोरकर म्हणाले येत्या काही कालावधीमध्ये गणेश कारखाना हमरापुरच्या वतीने अजुन काही पुस्तके ग्रंथालयाला भेट देण्यात येतील .
दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!