बातम्या

शिवसाई चॅम्पियन चषक 2023″ क्रिकेट स्पर्धा दिवा येथे उत्साहात संपन्न.

दिवा – (प्रमोद तरळ ) – शिवसाई मित्र मंडळ – दाभीळ (पाटीलवाडी)
या मंडळाच्या वतीने विभागात सामाजिक, शैक्षणीक, सांस्कृतिक व क्रिडा असे विविध कार्यक्रम मागील काही वर्षा पासून नियमितपणे राबवले जातात .या अनुषंगाने शिवसाई चॅम्पियन चषक२०२३” या क्रिकेट स्पर्धेचे पहिल्यांदा यू ट्यूब लाईव्ह या आधुनिक माध्यमातून आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा रविवार दिनांक ०९ एप्रिल २०२३ रोजी दिवा, (उसरघर ), किंग मैदान येथे यशस्वीरित्या पार पडली.
मुंबईतील या पहिल्या शिवसाई चॅम्पियन चषक २०२३ क्रिकेट स्पर्धेच्या विजेतेपदाचा मानकरी ठरला स्टार ११ क्रिकेट संघ – कोंढे तसेच समिक्षा ११ क्रिकेट संघ- दमामे बौद्धवाडी हा संघ उपविजेता पदाचा मानकरी ठरला. सदर स्पर्धे करिता प्रथम पारितोषिक रोख रक्कम – २५,०००/- व आकर्षक चषक तसेच द्वितीय पारितोषिक रोख रक्कम- १५,०००/- रू व आकर्षक चषक ठेवण्यात आले होत. स्पर्धेमध्ये उत्कृष्ठ क्षेत्ररक्षण -तूषार कासारे उत्कृष्ट फलंदाज समीर सावंत, उत्कृष्ठ गोलंदाज – सुशांत मोहिते मालिकावीर – समीर सावंत यांना सन्मानित करण्यात आले.
सदर स्पर्धेसाठी मुंबई, तसेच विभागातील विविध गाव व वाड्यातून अनेक मान्यवर प्रतिष्ठित व्यक्तींनी आपली उपस्थिती दर्शवली होती त्या मध्ये समाज सेवक आर.पी.जाधव , कुणबी समाज विकास संघ १८ उन्हवरे विभाग युवाध्यक्ष- विशालजी मोरे , कुणबी युवा वैद्यकीय विभाग अधिकारी – मनोहरजी टेमकर , समाज संघटक – सुनिलजी चव्हाण , गणेशजी जाधव,काशिनाथजी मोरे , काशिनाथजी कुळे, दिनेशजी मोरे, मणेशजी मोरे, अमितजी झेपले, संतोषजी भोगल,संदेशजी नाचरे, नितीनजी दवंडे, संदेशजी कानसारे, अनंतजी मळेकर, रीवानजी बद्रिके, संदिपजी पाटील, विनायकजी इंदुळकर, राहुलजी मांजरेकर ,अभिषेकजी मळेकर. गावावरुन विशेष उपस्थीत राहिलेले सागरजी वालवेकर यांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये स्कोरर म्हणून उत्तम कामगिरी बजावली व त्यांना अकीब दळवी व सुनिल खळे यांनी सहकार्य दिले तसेच एकनाथजी बेंद्रे यांनी सहाय्यक समालोचक म्हणून कामगिरी बजावली. स्पर्धेकरीता यशस्वी उद्योजक व समाजसेवक कल्पेशजी शितप साहेब यांची उपस्थिती खास होती. संपुर्ण स्पर्धेत मनिषजी लोंढे यांनी समालोचक म्हणून भूमिका पार पाडली. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी अनेक दानशूर व्यक्तींनी सढळ हस्ते मदत केली.शिवसाई क्रिकेट क्लबचे कर्णधार -अंकुश पाटील व सर्व खेळाडू सचिन पाटील, राहूल पाटील, आदित्य पाटील,कल्पेश पाटील, संतोष पाटील, संदेश पाटील, नरेश पाटील, दिपेश पाटील, शुभम पाटील, यांची प्रचंड मेहनत व मार्गदर्शक – शांतारामजी पाटील, सल्लागार – दिनेश पाटील, निलेश पाटील,जिगर पाटील यांच्या उत्कृष्ट नियोजनाखाली मुंबईतील पहिले पर्व शिवसाई चॅम्पियन चषक २०२३” क्रिकेट स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या व आनंदमय वातावरणात यशस्वी पणे पार पडली . दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात…

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!