उ.बा.ठा गटाचे रायगड जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे तसेच ग्रामंचायत चौल मार्फत चौल भोवाळे येथील पर्वत वासी दत्त मंदीरात पिण्याच्या पाण्याची गैरसोय लक्षात घेता येणाऱ्या पर्यटकाना तसेच भाविकांना सुयोग्य पाणी मंदीर परिसरात असावे ह्या आधी ग्राम पंचायती मार्फत पाण्याची जल वाहिनी होती परंतू अनेक अडचणी येत होत्या त्यामुळे नूतन जल वाहिनी व ५०००लिटर पाण्याचा टाकी मार्फत साठा त्याच बरोबर मंदीर परिसरात अत्याधुनिक विजेचे दिवे बसण्यात येणारं आहेत पर्यटन विकास मंडळाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार आहे नुकतेच जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे याच्या हस्ते श्री फळ वाढून कामाचा शुभारंभ करण्यात आला प्रसंगी चौल ग्रामंचायत सदस्य, मान्यवर तसेच सरपंच प्रतिभा पवार, उप सरपंच अजित गुरव व शिवसैनिक तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिनिधी : अलिबाग मिथुन वैद्य दखल न्यूज महाराष्ट्र.
