खेड : प्रतिनिधी : अक्षय कदम
रत्नागिरी : जिल्ह्यातील खेड तालुक्यातील तालुक्यापासून जवळजवळ ६५ किलोमीटर अंतरावर निवे रामवाडी वसलेली आहे.निवे रामवाडीतील लोकांना नसलेल्या विहीरी मधून पाणी पिण्यासाठी उपलब्ध होत असे.पण २१ आणि २२ जुलै २०२१ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे निवे रामवाडीची नदीमध्ये असलेली विहीर प्रचंड पाण्यामुळे वाहून गेली आणि निवे रामवाडीची पाणी समस्या निर्माण झाली.तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या निवे रामवाडी लोकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत होती.पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या निवे रामवाडी ग्राम वासीयांचा पाणी प्रश्न सोडण्यासाठी जल फाऊंडेशने पुढाकार घेतला.ही समस्या समाजसेवक खालीद भाई चौगुले यांच्याजवळ मांडली.महाराष्ट्र कॉलेज मुंबई या कॉलेजचे प्राध्यापक डॉ सिराज चौगुले सर यांच्या नेतृत्वाखाली शिक्षक कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी निवे रामवाडीसाठी बोरींगसाठी आर्थिक स्वरूपात मदत केली.
सोमवार दिनांक १७ एप्रिल २०२३ रोजी निवे रामवाडीत बोरींग मारून पाणी प्रश्न मार्गी लावला. निवे रामवाडी ग्राम वासियांच्या वतीने महाराष्ट्र कॉलेज मुंबई विद्यार्थ्यांचे, समाजसेवक खालिद भाई चौगुळे साहेब,जल फाऊंडेशचे अध्यक्ष नितिन जाधव साहेब, जल फाऊंडेशनचे सल्लागार वसंत मोरे साहेब,जल फाऊंडेशन टीमचे,नाडकर बोअरवेल चे नाडकर साहेब आणि त्यांचे सहकारी यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले. दखल न्यूज महाराष्ट्र.