राजापूर – (प्रमोद तरळ) तालुक्यातील मौजे मोगरे पंचक्रोशी गावची ग्रामदेवता श्री भद्रकाली (भराडीन) देवीचा प्रथम वर्धापनदिन सोहळा शुक्रवार दि. १२ मे २०२३ रोजी विविध कार्यक्रमांनी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येत आहे
सकाळी ९ ते ११ या वेळेत श्री गणपती पूजन, पुण्याह वाचन, देवतास्थापन, पूजाहवन, पूर्णाहुती, अभिषेक, बलिदान व महाआरती, स. ११.३० वा. श्री निनादेवी महिला ढोलपथक राजापूर यांच्या ढोलताशा पथकाचा कार्यक्रम,दु. १.३० ते ४ महाप्रसाद, भंडारा, दु. ३ ते ५ या वेळेत महिला हळदीकुंकू समारंभ, सायं ६ ते ८ किर्तनकार बुवा हे.भ.प. निकिता नरेश शेलार, देवाचेगोठणे यांचे किर्तन होणार आहे तर रात्री १० वाजता मुंबईत गाजत असलेल्या “टेढेमेढे” या नाटकाचा प्रयोग होणार आहे तरीही पंचक्रोशीतील भाविक, ग्रामस्थांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवारासह मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री भद्रकाली (भराडीन) देवस्थान पंचक्रोशी समितीने केले आहे.
