चिपळूण (ओंकार रेळेकर)पालकमंत्री ना. उदय सामंत व दुसरे त्यांचे मोठे बंधू उद्योजक किरण सामंत या दोघांची कार्यतत्परता एका प्रसंगातून पुढे आली आहे. खेडमधील
अताउल्लाह तिसेकर यांना याची प्रचिती आली असून
एक कार्यतत्पर पालकमंत्री आणि त्यांचे बंधू किरण
सामंत हे देखील कार्यतत्पर असल्याचे या प्रसंगातून
स्पष्ट झाले आहे.या भावांची काम करण्याची वेगळी वेगळी आहे. हे दोघेही लोकसेवेकरिता सदैव तत्पर असतात आणि
कार्यकर्त्यांच्या मदतीला नेहमीच धावत असतात.
याचा अनुभव खेड येथील कार्यकर्त्यांनी घेतला.
तिसेक एका अधिकाऱ्याला कामानिमित्त भेटायला
रत्नागिरीमध्ये गेले होते. रत्नागिरीमधील फार माहिती
नसल्याने व ज्या कार्यालयात काम आहे तेथील
अधिकाऱ्याविषयी देखील त्यांना काहीच माहिती
नव्हती. त्यांनी किरण उर्फ भैया सामंत यांच्या
परिचयाचे फैयाज मुकादम यांना फोन केला आणि
आम्ही खेडमधून कामानिमित्त रत्नागिरीला आलो
आहोत व ज्या कार्यालयात काम आहे तेथील
अधिकाऱ्याला भेटून आमची कामे पूर्ण करून लवकरच परत जायचे आहे, असे सांगितले. मुकादम
यांनी एक क्षणही उशीर न करता लगेचच सांगितले की
तुम्ही किरण सामंत यांच्या ऑफिसमध्ये या… सामंत
यांच्या ऑफिसकडे गेल्या नंतर भैया सामंत त्यांची
वाट पाहत होते. त्यांनी काम कोणत्या ऑफिसमध्ये
आहे इतकी घाई करण्याचे कारण समजून घेतले आणि
ताबडतोब संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला व या
लोकांचे काम कायद्यात असेल तर ताबडतोब करून
घ्या आणि त्यांना खेडला जाण्यासाठी मोकळे करा.
खूप लांब वरून ते प्रवास करून कामानिमित्त रत्नागिरी
आलेले आहेत, अशी विनंती केली. संबंधित
कार्यालयात तातडीने तिसेकर गेले त्या ठिकाणी
कामाची पूर्तता वेळेत झाली. या नंतर तिसेकर यांनी
सामंत यांचे आभार मानले. हा अनुभव त्यांनी त्यांच्या
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करताना म्हटले
आहे की, भैया सामंत यांची कार्यतत्परता पाहून
आमच्या मनात लगेचच विचार आला की अशा पद्धतीने लोकनेते काम करत असतील तर आपल्या जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही. दखल न्यूज महाराष्ट्र
