बातम्या

अद्वैत माने यांची आंतरराष्टीय स्तरांवर उत्तुंग भरारी…!

मुंबई – (प्रमोद तरळ)
टी टी कव्हर लँडचोरे इनडोअर स्टेडियम हॉल, काठमांडू, नेपाळ येथे आयोजित ९ व्या आंतरराष्टीय कराटे व किक बॉक्सिंग स्पर्धेत मुंबईच्या अद्वैत माने उत्तुंग भरारी मारली आहे. अद्वैत याने +८४ या वजनी गटात श्रीलंकेच्या प्रतिस्पर्धी खेळाडूला नमवून सुवर्ण पदक पटकावलं. वयाच्या १० व्या वर्षांपासून अद्वैत हा खेळ खेळत असून आतापर्यंत त्यांने राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर त्याने ५ सुवर्णपदकं, ६ रौप्यपदकं तर ८ कांस्यपदकं पटकवली आहेत. त्याच्या या खेळीबद्दल मुंबई महाराष्ट्रांत सर्वत्र कौतुक केलं जात आहे. दखल न्यूज महाराष्ट्र

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!