बातम्या

राजापूरातील तुळसुंदे उगवतीवाडी येथे म्हामदोत्सव – २०२३ चे आयोजन….

राजापूर – (प्रमोद तरळ) श्री विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ,तुळसुंदे (उगवतीवाडी) यांच्या वतीने गुरुवार दि.२२ जून ते २५ जून २०२३ पर्यंत आषाढ शुद्ध सप्तमी ‌” म्हामदोत्सव” साजरा करण्यात येणार आहे
गुरुवार दि.२२ रोजी पहाटे ५.३० वा. श्री काडसिध्देश्वर भक्त मंडळ,तुळसुंदे यांची काकड आरती, स. ९.०० वा. श्रीची पुजा, अभिषेक व महाआरती, स. ११.०० वा. मान्सून चषक अंडर‌ आर्म क्रिकेट स्पर्धा उद्घाटन सोहळा,दु. १२ ते २ यावेळेत महाप्रसाद (निळकंठेश्वर भक्त मंडळ तुळसुंदे यांजकडून) दु. ४.०० वा. चित्रकला स्पर्धा, रा. ८.०० वा. बालमित्र भजन मंडळ, तुळसुंदे यांचे सुस्वर भजन, रा. १०.०० साईराज स्वरसम्राट आर्केस्टा् सादर होईल
शुक्रवार दि. २३ रोजी पहाटे काकड आरती,स. ९.०० वा. श्रीची पुजा, अभिषेक व महाआरती,स. १०.०० वा मान्सून चषक, दु. १२ ते ३ महाप्रसाद (कु. संस्कार व आयुष पावसकर यांजकडून), दु. ४.०० वा. सुंदर हस्ताक्षर स्पर्धा सायं ७.०० वा. महाआरती व स्थानिक भजने, रा. १०.०० वा. रामेश्वर रंगभूमी गावखडी धमाल विनोदी नाटक “श्रीमंत दामोदरपंत” सादर करणार आहेत
दि. २४ जून शनिवार रोजी पहाटे ५ .०० वा काकड आरती,‌स.९.०० वा. श्रीची पुजा व श्री सत्यनारायण महापूजा व महाआरती, स. १०.०० वा. मान्सून चषक‌ दु. १२ ते ३ वा.‌ पर्यंत महाप्रसाद (कु. स्वरा व पूर्वी किरण आडिवरेकर यांजकडून), दु. ४.०० वा. मत्सगंधा महिला मंडळ,तुळसुंदे उगवतीवाडी आयोजित ‘हळदीकुंकू’, दु. ४.०० वा. ह.भ.प. सुरेखा जोशी, रत्नागिरी यांचे‌ किर्तन, सायं ७.०० महाआरती व भजने, रा. ९. वा. विद्यार्थी गुणगौरव सोहळा,रा. १०.०० वा. मत्सगंधा महिला मंडळ तुळसुंदे प्रस्तुत डान्सचा सदाबहार नजराणा हा कार्यक्रम सादर होणार आहे
रविवार दि. २५ रोजी‌ पहाटे ५.३० वा. काकड आरती, स.९.०० वा. श्रीची पुजा‌ व महाआरती, स. ११.०० बुवा श्री रोहिदास आडिवरेकर यांचे सुस्वर भजन,दु.१२.०० वा. श्रीची भव्य मिरवणूक व दिंडी, सायं ७.०० महाआरती व भजने,रा. ८.०० वा. कोकणरत्न भजनसम्राट बुवा संतोष शिर्सेकर यांचे शिष्य बुवा अमित डोर्लेकर यांचे सुस्वर भजन,रा. वा बक्षीस वितरण सोहळा, रा. १०.०० वा.वेळगिवे, ता.देवगड सिंधुदुर्ग येथील बुवा कु. समृद्धी चव्हाण व धोपावे, गुहागर मधील बुवा कु आकर्षणी शिरगावकर या दोन महिला बुवांचा डबलबारी सामना रंगणार आहे सोमवार दि. २६ जून रोजी विसर्जन सोहळा व भव्य दिंडी मिरवणूक होणार आहे तरीही सर्व ग्रामस्थांनी या सोहळ्याला उपस्थित रहावे असे आवाहन श्री विठ्ठल रखुमाई सेवा मंडळ, मत्स्यगंधा महिला मंडळ व श्री विठ्ठल रखुमाई क्रिकेट मंडळ,तुळसुंदे उगवती वाडी यांनी केले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात..

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!