सुभाष लाड
एम्.ए;बी.एड.
(सेवानिवृत्त शिक्षक )
आपला भारत देश स्वतंत्र झाला त्याकाळात गरिबी,अज्ञान,भेदभाव,पायाभूत सुविधांचा अभाव अशा अनेक समस्या होत्या.यामागे जी काही कारणे होती त्यामध्ये शिक्षणाचा अभाव हे एक प्रमुख कारण होते.महाराष्ट्रातल्या समाजधुरिणांनी ,जनसामान्यांनी गावोगावी,खेडोपाडी शिक्षणाची ज्ञानगंगा यावी यासाठी प्रचंड प्रयत्न आणि अथक परिश्रम घेऊन शिक्षणसंस्था,शाळा उभारल्या.पण अलिकडे महाराष्ट्राच्या विशेषत: ग्रामीण भागातील शाळामंधून विद्यार्थी संख्येचा पट वेगाने कमी होत आहे.ज्ञानदानाच्या प्रक्रियेत निर्माण झालेली ही मरगळ ,उदासिनता झटकून आज शाळासंवर्धनाची फार मोठी गरज आहे.
महाराष्ट्रातील लांजा तालुक्यात ज्यांनी आपले बालपण घालविले.शालेय शिक्षणासाठी खेड्यापाड्यातल्या विद्यार्थ्यांची वणवण स्वत: अनुभवली,लहानपणीच पितृछत्र हरपल्याने ज्यांना फार मोठा शैक्षणिक व सामाजिक संघर्ष करावा लागला असे सेवानिवृत्त शिक्षक,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष लाड हे महाराष्ट्रातील,विशेषत: कोकणातील बहुतांश शाळांची ही दुरावस्था थांबावी,शाळा उर्जितावस्थेत याव्यात ,शाळांचे उत्तमप्रकारे संवर्धन व्हावे यासाठी कळकळीचे आवाहन करीत आहेत. मुलांच्या पर्ययाने देशाच्या उज्जवल भविष्यासाठी हे आव्हान आपण सर्वांनी आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून स्विकारायला हवे!
दखल न्यूज महाराष्ट्र.

