जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, बाळ माने यांच्या हस्ते केले सन्मानित
विशेष प्रतिनिधी : निलेश आखाडे
रत्नागिरी : भाजपाच्या मोदी मोदी @ ९ या उपक्रमाअंतर्गत रत्नागिरी शहरातील ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. भाजपा जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, माजी आमदार बाळ माने आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. भाजपाच्या जिल्हा संपर्क कार्यालयात शनिवारी सकाळी कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
याप्रसंगी ॲड. पटवर्धन म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखे सक्षम नेतृत्व देशाला लाभले आहे. पूर्वीच्या काळात कार्यकर्त्यांनी हालअपेष्टा सहन केल्या व आज हे यश मिळाले आहे. त्यामुळे जुन्या कार्यकर्त्यांचा सन्मान केलाच पाहिजे. त्याच वेळी या कार्यकर्त्यांचे योगदान नव्या कार्यकर्त्यांना कळले पाहिजे व समन्वय साधून पुन्हा २०२४ मध्ये भाजपाला निवडून द्यायचे आहे. याकरिता हा अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम आहे. त्यातून भाजपाला अपेक्षित परिणाम साधता येऊ शकेल. २०२४ मध्ये भाजपचे खासदार मोठ्या प्रमाणात वाढतील. गेल्या ९ वर्षांत भाजपा सरकारच्या योजनांची माहिती, बदल लोकांना सांगणे याकरिता सज्ज राहण्याचे आवाहन मोदींनी केले आहे. भाजपाचे काम हायटेक झाले आहे. सातत्याने नवनवीन उपक्रम, कार्यक्रम राबवले जात आहेत. याप्रसंगी प्रदेश सदस्य ॲड. बाबा परुळेकर, जिल्हा सरचिटणीस सचिन वहाळकर, विजय पेडणेकर, शहराध्यक्ष अण्णा करमरकर, तालुकाध्यक्ष मुन्ना चवंडे, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्रम जैन आदींसह जिल्हा, शहर, तालुक्याचे पदाधिकारी उपस्थित होते.
यांचा झाला सत्कार
श्रीनिवास दळवी, श्रीकृष्ण खेर, मंदार सरपोतदार, सौ. दाक्षायणी बोपर्डीकर, नीताताई दाते, शंकर खेर, सुहास बाम, अशोक अभ्यंकर, माधव देवस्थळी, विजय आचरेकर, भालचंद्र हळबे, श्रीकांत जोशी, नूरमहम्मद सुवर्णदुर्गकर, मुन्नाशेठ सुर्वे, लिलाधर जोशी, रवींद्र मांडवकर, सत्यवती बोरकर, श्रीकांत ढालकर, जैनु सुवर्णदुर्गकर, प्रदीप फडके, अविनाश मुकादम, शेखर लेले, दत्तात्रय जोशी, अनंत मराठे, उदय गोवळकर, सौ.व श्री. कैलास विलणकर. दखल न्यूज महाराष्ट्र

