रत्नागिरी शहर प्रतिनिधी : हर्ष नागवेकर.
रत्नागिरी : सुरुवातीला भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांच्यामध्ये शिक्षक भरती वरून श्रेयवादाची लढाई पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात तात्पुरते शिक्षक नेमण्याचा निर्णय पालकमंत्री उदय सामंत यांचा असे जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी म्हंटले भरती वरून कोणी श्रेय लाटू नये राहुल पंडित यांनी सल्लाच दिला. मुलांचे शिक्षण थांबू नये, यासाठी तात्पुरते शिक्षक नेमण्यात येत आहेत. ही भरतीही ग्राम पातळीवरच केली जाईल असा निर्णय आणि आदेश अल्पबचत सभागृहात झालेल्या मिटिंग मध्ये पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतला.
आधीच शिक्षकांच्या जागा रिक्त होत्या. त्यात या जिल्हा बदलीमुळे रिक्त जागांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शिक्षक भरतीबाबत न्यायालयामध्ये खटला सुरू आहे. इतर जिल्ह्यात अशा तात्पुरत्या शिक्षकांनाजे मानधन दिले जात आहे. त्या तुलनेत रत्नागिरी जिल्ह्यात अधिक मानधन दिले जाणार असल्याचे धाडसी निर्णय पालकमंत्री सामंत यांनी घेतला आहे. मात्र या शिक्षक भरती बाबत आता श्रेय वाद सूरू झाला असुन काही पक्षाचे पुढारी श्रेय घेण्यासाठी पुढे आले आहेत. जिकडे पालकमंत्री उदयजी सामंत येथील जनतेसाठी धाडसी निर्णय घेत असुन कोणी त्यांचे श्रेय लाटू नये असा सल्लाच शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित यांनी दिला.

➡️ राहुल पंडित यांनी जर मला फोन केला असता तर मी सविस्तर माहिती दिली असती – प्रमोद जठार राहुल पंडित यांनी शिक्षक भरती मध्ये श्रेय पालकमंत्री उदय सामंत याचेच आहे. बाकी कोणी याचे श्रेय घेऊ नये असे सांगताच प्रमोद जठार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये जे काही सातशे साडेसातशे शिक्षक भरती प्रक्रियेत इतर जिल्ह्यांमध्ये परत गेले. त्या बदली प्रकरणांमध्ये ते पाच शिक्षक परत आले अन्य काही शाळांमध्ये शिक्षक नसल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. गेले आठ दिवस 15 तारखेपासून शाळासुरु झाली. पण शाळा मध्ये शिक्षकच नाही त्याबाबत तातडीने कारवाई होऊन माझं भारतीय जनता पार्टीचे व शिवसेनेचे सरकार म्हणजे शिंदे फडणवीस सरकार ज्या सरकारने याची दखल घेऊन परवाच्या दिवशी जो काही जीआर काढला त्या संबंधित रात्रीची कार्यवाही केली. या सगळ्या गोष्टी जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारचा प्रतिनिधी म्हणून मी काम केलं याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा श्रेय वादाचा विषय नव्हता असे जठार यांनी म्हंटले.
राहुल पंडितयांनी मला थेट बँकॉक मधून फोन करून माहिती घेतली असती तरी मी फोनवर त्यांना माहिती दिली असती. या मध्ये कुठलाही श्रेयवाद नाही राहुलजी हा तुमच्या नि माझ्या शिंदे सरकारने केलेल्या कामाचा जीआर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम प्रामाणिकपणे कार्यकर्ता म्हणून मी केलं आहे असे जठार यांनी म्हंटले.
मंत्री उदय सामंतांनी पण त्या ठिकाणी प्रयत्न केले आम्ही कोणीही त्यांचे प्रयत्न नाकारत नाही. राज्य सरकारने केलेल्या कामाचा जीआर या ठिकाणी राज्य सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून वार्ताहर परिषदेच्या माध्यमातून लोकांसमोर दिला माहिती दिली घाबरू नका पॅनिक होऊ नका शिक्षक मिळतील. त्यामध्ये कुठलाही वाद नव्हता फडणवीस आणि शिंदे सरकार यांचा जीआर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. मला वाटतं मित्रपक्ष आणि आम्ही सगळे मिळून केलेल्या कामाचं त्यात कुठलाही श्रेयवाद नाही असे जठार यांनी सांगितले..

राहुल पंडित यांना श्रेय घेण्याची एवढी हौस आहे तर…
➡️ नंदू चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा भाजपा. यांनी यामध्ये उडी घेत म्हंटले की… नीट डोळे उघडून जिल्ह्याची अवस्था बघा. रत्नागिरी शहर बघा. भीषण पाणी टंचाई, अर्थवट ST स्टँड, निकृष्ट दर्जाचे रस्ते, गटारे, बंद पडलेली सिग्नल यंत्रणा, शासकीय रुग्णलयांमध्ये डॉक्टर कमतरता, हतबल आरोग्य यंत्रणा, मेडिकल-इंजिनिअरिंग कॉलेज कमतरता, शहर कचऱ्याची विल्हेवाट, कचऱ्यामुळे होणारे प्रदुषण, इनडोअर स्टेडियम ची दयनिय अवस्था, बंद पडत असलेल्या कंपन्या, रोजगाराची समस्या, MIDC ची दुरावस्था, अर्थवट महामार्ग, व्यसनाधीनतेचे वाढते प्रमाण या सर्वांचे श्रेय देखील घ्यावे. हे या वीस वर्षातले पाप आहे. यासर्वांची कावड आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या नेत्याची बाजू मांडावी. भाजपचे नेते,माजी आमदार प्रमोद जठार यांनी युती सरकारचे प्रतिनिधी म्हणून माहिती दिली. त्यांनी पालकमंत्री चे प्रयत्न देखील मान्य केले, बोलून दाखवले पण शिवसेना जिल्हाप्रमुख यांना आपल्या नेत्याची बाजू उचलून धरण्याची सवय असल्याने ते बोलतात. आम्ही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत.. चांगले काम झाले तर चांगले देखील बोलतो. आणि चुकीचे झाले तर चूक देखील दाखवतो तेही नाव घेऊन. आमच्या साठी जनतेची बाजू मांडणे प्रमुख कर्तव्य आहे. रत्नागिरी मध्ये शिंदे सरकारची शिवसेना आणि भाजप मधील वाद आता चव्हाट्या वर येऊ लागला आहे. भाजप चे कार्यकर्ते आता शांत न रहाता व्यक्त होऊ लागले आहेत. यातच कमी की काय म्हणून रत्नागिरी शहरातील भाजपाचे बॅनर हटवण्यावरून देखील काहीशी कुरकुर पाहायला मिळाली.
बॅनर काढण्याचे काम कोणाचे..? कारणाशिवाय कोणी आमचे बॅनर काढून टाकणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही : प्राजक्ता रूमडे.
रत्नागिरी शहर भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक सहा नाचणे पावर हाऊस या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे धन्यवाद मोदीजी आशयाचे बॅनर प्रभागातील कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले होते. हे बॅनर कोणी हटवले याबाबत परिसरामध्ये चर्चेला उधाण आले आहे.
नगर परिषदेच्या एका कर्मचाऱ्याने ते बॅनर काढून संबंधित कार्यकर्त्याच्या घरी नेऊन दिले मात्र हे बॅनर काढण्यास कोणी सांगितले असा प्रश्न केला असता त्याने शिवसेनेच्या (शिंदे गटाच्या) एका पदाधिकाऱ्यांचे नाव घेऊन त्यांनी हे काढायला सांगितल्याचे सांगितले आहे सांगितले.
नाचणे पावर हाऊस या परिसरामध्ये रस्ता रुंदीकरण आणि गटाराचे काम सुरू आहे या परिसरामध्ये हे बॅनर लावले होते परंतु या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्याचा बॅनर काढायला सांगण्याचा अधिकार काय? असा सवाल भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्ष प्राजक्ता रुमडे यांनी केला आहे. लावण्यात आलेले बॅनर हे काढायचे असेल तर नगर परिषदेच्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी तसेच सांगणे अपेक्षित होते. मात्र त्यांनी असा कोणताही आदेश दिला नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले आहे. विनाकारण भारतीय जनता पार्टीचे बॅनर कोणत्याही कारणाशिवाय कोणी हटवत असेल तर हे चुकीचे आहे. प्रशासनाचे काम करण्याचा कोणत्या राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याने ठेका घेतला आहे का.? आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांनी सुरू केलेल्या लोकाभिमुख योजना लोकांपर्यंत पोहोचाव्या या उद्देशाने मोदीजींना धन्यवाद देणारे बॅनर भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात येतात. असे बॅनर कारणाशिवाय काढून टाकून काय मिळाले? असा सवाल भारतीय जनता पार्टीच्या जिल्हाध्यक्ष प्राजक्ता रूमडे यांनी केला आहे. भाजपाचे सर्व पदाधिकारी प्रत्येक गोष्टीमध्ये शिंदे गटास सहकार्य करत असताना अशा प्रकारे नाहक कारणाशिवाय कोणी आमचे बॅनर काढून टाकणार असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही असे प्राजक्ता रूमडे यांनी म्हंटले आहे..
