खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील किल्लेमाची गावचे सुपुत्र दत्ताराम बळीराम कदम यांचे अल्पशा आजाराने मंगळवार दिनांक २० जून २०२३ रोजी दुःखद निधन झाले.कुटुंबाचा आधार असणाऱ्या एखाद्या व्यक्तीचे निधन होते तेव्हा कुटुंब पोरके होऊन जाते.बाप घराचा आधार असतो,बाप घराचा पाया असतो,पण बाप नावाचे छत्र आयुष्यामधून निघून जाते तेव्हा सारे घर सुने सुने होऊन जाते. दत्ताराम बळीराम कदम यांचे दशक्रिया विधी गुरुवार दिनांक २९ जून २०२३ ला आणि उत्तरकार्य (बारावे)रविवार दिनांक २ जुलै २०२३ रोजी किल्लेमाची गावी राहत्या घरी होणार आहे.तरी आपण समस्त ग्रामस्थ, समाजबांधव,सगे सोयरे आणि नातेवाईक यांनी उपस्थित राहवे.
🙏🏼शोकाकुल🙏🏼
पत्रकार कु.अक्षय दत्ताराम कदम(मुलगा)
कु.राहुल दत्ताराम कदम(मुलगा)