मुंबई – (प्रमोद तरळ) मंगळवार दिनांक २० जून २०२३ रोजी दुपारी २:३० वा. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सन्मा. रमेशजी बैस यांची बळीराज सेना व कुणबी समाजोन्नती संघ यांच्या वतीने संयुक्त भेट घेऊन कोकणात बारसू सोलगाव येथे प्रस्तावित रिफायनरीच्या आंदोलनात ज्या पद्धतीने तेथील कुणबी समाजावर अमानुषपणे लाठीचार्ज करून, खोटे गुन्हे दाखल करून स्थानिक ग्रामस्थांवर राज्य सरकारच्या आदेशाने रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाने जो अत्याचार केला त्या संदर्भात आम्हा गोरगरीब समाज बांधवांना व तेथील शेतकरी जमीनदारांना न्याय मिळावा ही मागणी करण्यात आली.

तसेच कुणबी समाजावर इतरही होत असलेल्या अन्याय अत्याचारा बाबत चर्चा करण्यात आली .कुणबी समाजाचे, बहुजनांचे, शेतकऱ्यांचे असलेले अधिकार व हक्क जे शासनाकडून मिळत नाहीत. काही ठिकाणी शासनाचे आदेश नसल्याने प्रशासन आम्हास वेठीस धरते या एकंदरीत सर्वच प्रश्नांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली, राज्यपाल महोदयानी एकंदरीत सर्वच प्रकरणात स्वतः लक्ष घालून तुम्हाला न्याय मिळेल. असे आश्वासन दिले, बळीराज सेना आणि कुणबी समाजोन्नती संघ यांच्या वतीने राज्यपाल महोदयांचा शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. व आभार मानण्यात आले. या बैठकीला संघ अध्यक्ष भूषण बरे, बळीराज सेना अध्यक्ष अशोक वालम संघ सरचिटणीस अरविंद डाफले, उपाध्यक्ष कृष्ण कोबनाक, सरचिटणीस प्रकाश तरळ, संभाजी काजरेकर, नंदकुमार मोहिते ॲड.विनेश वालम,मनोहर पवार आदी समाजनेते उपस्थित होते.
