चिपळूण – (प्रमोद तरळ)
बहुजन समाजाची आजही आर्थिक व राजकीय स्थिती मागासलेलीच आहे . यामध्ये जगाचा पोशिंदा असणाऱ्या कुणबी समाजाचा सामाजिक स्तर अजूनही उंचावलेला नाही. त्यामुळे आता या सर्व घटकांना एकत्रित करून बळीराज सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या विधानसभेत सत्तेची भागीदारी निश्चित मिळवून देऊ. आपण पोशिंदा होतो आता राज्यकर्ते बनूया कारण विकासाची गुरुकिल्ली म्हणजेच राजसत्ता,असा विश्वास बळीराज सेनेच्या मेळाव्यात पक्षप्रमुख अशोक वालम यांनी सर्वांना दिला
गुहागर शृंगार तळी येथील गुहागर बाजार या ठिकाणी स्व. राजारामभाऊ बेंडल सभागृहामध्ये बळीराज पक्षाची जिल्ह्यातील पहिली सभा रविवार १६ रोजी आयोजित करण्यात आली होती. या सभेला संघाध्यक्ष भूषण बरे , संघ सरचिटणीस अरविंद डाफले, कुणबी युवा मुंबई युवा अध्यक्ष माधव कांबळे, बळीरास सेनेचे सरचिटणीस नंदकुमार मोहिते, संभाजी काजरेकर, पक्ष उपनेते एड. चंद्रकांत कोबनाक , उपाध्यक्ष सुरेज भायजे आणि पक्षाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. सभेच्या अध्यक्षस्थानी रामचंद्र हुमणे होते.
कार्यक्रमात पुढे बोलताना श्री वालम म्हणाले की, सध्या महाराष्ट्राचे राजकारण ज्या स्तराला गेले आहे ते पाहता स्थानिकांनी बळीराज सेना पक्षासोबत भविष्यातील राजकारणाची वाटचाल सुरू करण्याचे निश्चित केले आहे. महाराष्ट्र सर्वत्र बळीराज सेनेचा विस्तार सुरू आहे. कुणबी समाज उन्नती संघ मुंबई मातृसंस्थेच्या माध्यमातून बळीराज सेना कामकाज करणारा आहे आतापर्यंत आपण दुसऱ्याची चाकरी केली आता आपण सर्वांनी मिळून बळीराजा सेनेच्या माध्यमातून महाराष्ट्र मध्ये सत्तेत आपली भागीदारी मिळवूया आणि ती मिळवणारच असा विश्वास यावेळी अशोक वादन यांनी दिला
त्यांनी पक्षाची ध्येय – उद्दिष्ट या सोबत आपला पक्ष जे इतर राजकारण्यांनी महत्त्वपूर्ण कामे पूर्ण नाही केली ती बळीराज पक्ष पूर्ण करून कोकणातील जनतेला न्याय देईल याचे वचन दिले.

कोकणातील महत्त्वाचा विषय तो म्हणजे कुळवहीवाट, बेदखल कुळ, जातीचे दाखले. ज्यामुळे कोकणातील तरुण वर्ग अजूनही आर्थिक दृष्ट्या मागास राहिला आहे.
कोकणातील तरुणांचा विकास करायचा असेल तर प्रत्येक तालुक्यात उच्चशिक्षित महाविद्यालये व तेथील उत्पन्नावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योग धंद्याची गरज आहे. ते न करता येथील राजकारणी नेते कोकणाला प्रदूषणकारी रिफायनरीच्या माध्यमातून उद्ध्वस्त करण्यास निघाले आहेत, जे आपण कोकणी जनता आणि निसर्गप्रेमी माणसं कदापि होऊ देणार नाही. कोकणात वैद्यकीय व्यवस्था ज्या प्रकारे अपुरी पडत आहे त्यावर सध्यस्थितीत असलेल्या सरकारचे लक्ष वेधून बळीराज सेना पक्षाच्या पुढाकाराने संपूर्ण कोकणातील गावागावात असलेले प्राथमिक आरोग्य केंद्र जी फक्त उभारून त्यात कसलीच सेवा चालू नाही ती सुरू करण्यास सरकारला भाग पाडू असे ही यांनी सांगितले.
गुहागर संघ शाखा ग्रामीण व मुंबई, युवा शाखा यांच्या माध्यमातून या सभेचे आयोजन करण्यात आले होते. बळीराज सेना पक्ष आणि त्यांबद्दल माहिती घेण्यासही ही सभा होती. गुहागर संघ शाखा मुंबईचे अध्यक्ष कृष्णा वणे , रामचंद्र हुमणे पांडुरंग पाते आणि इतर सर्व पदाधिकांनी मिळून या सभेचे योग्य नियोजन केले होते प्रास्ताविक कृष्णा वणे यांनी केले तर सूत्रसंचालन पांडुरंग पाते यांनी केले.
