पालघर – (प्रमोद तरळ) दि. १६ जुलै २०२३ रोजी शिवशंभू गडरक्षक प्रतिष्ठान,पालघर यांच्या वतीने अशेरीगड स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.मोहीमे दरम्यान ३० बॅग प्लास्टिक बाटल्या आणि १ बॅग दारूच्या बाटल्या अशा एकूण ३१ बॅग कचरा जमा करून तो गडाखाली आणून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.या अगोदरही अशेरीगडावर दुर्गसेवकांकडून १६ मोहीमा राबवण्यात आल्या होत्या त्या प्रत्येक मोहीमेत २०-२५ बॅग कचरा जमा केला गेला.एका मोहीमेत तब्बल १४३ बॅग कचरा १८ बॅग दारूच्या बाटल्या असा एकूण १६३ बॅग कचरा जमा केला होत्या.प्रत्येक मोहीमेत एवढा कचरा जमा करून देखील गडावर कचरा करण्याचे प्रमाण कमी होत नाही. वनविभाग व जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच १६ जुलैच्या मोहीमेत काही समूह गडावर जाऊन मद्यपान करताना आढळले. दुर्गसेवकांनी त्यांना समज देऊन गडउतार होण्यास सांगितले.
आपल्या महाराष्ट्राचा ऐतिहासिक वारसा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या मावळ्यांचा पराक्रम. आणि याच इतिहासाचा महत्त्वाचा भाग म्हणजे हे गडकोट. परंतु आज हेच गडकोट मद्यपींचे अड्डे बनत आहेत.लोक गडावर फिरण्यासाठी येतात व येताना सोबत आणलेल्या बाटल्या व कचरा गडावरच टाकून जातात. सर्वांना एकच विनंती असेल कि आपण जर गडावर येत असाल तर सोबत आणलेला कचरा गडाखाली घेऊन यावा. आज जर आपण या गडकोटांचे संवर्धन केले तरच आपण आपला इतिहास उद्याच्या पिढीला दाखवू शकतो.जर आपणही या कार्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक असाल तर अमोल अडखळे – ९१६८७४४२३०, विकी पाटील – ७०३०३४४०७५, अनिकेत कुडतरकर – ९९६०९८१९६२ आदी दुर्गसेवकांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र

