बातम्या

फटकरे वाडी, संगमेश्वर येथील माघी गणेशोत्सव निधीसाठी शाहीर बिनेश वाजे व वैभव नामे यांच्या नाचाचा जंगी सामना..

मुंबई – (प्रमोद तरळ) श्री ग्राम विकास मंडळ लोवले फटकरे वाडी संगमेश्वर येथील रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करणाऱ्या माघी गणेशोत्सव मंडळाच्या मदत निधीसाठी शक्तीवाले शाहिर श्री बिनेश वाजे व तुरेवाले शाहीर श्री वैभव नामे या दोन युवा शाहीरात तुफान जुगलबंदीचा सामना रंगणार आहे
शनिवार दि. २२ जुलै २०२३ रोजी रात्री ८.३० वाजता दामोदर हाॅल परेल येथे या दोन शाहीरात तुल्यबळ लढत होणार आहे झी मराठी, कलर्स मराठी फेम शक्तीवाले शाहिर बिनेश वाजे हे मु. गोविळ ता.लांजाचे सुपुत्र असून श्री स्वामी समर्थ नाच मंडळ, दहिसर हे त्यांचे नॄत्य पथक आहे तर तुरेवाले शाहीर वैभव नामे हे ‌ वस्ताद कवी, शाहीर दिलीप नामे यांचे शिष्य आहेत मदत निधीसाठी आयोजित कलगी- तुरा सामन्याला चाकरमान्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन‌ श्री ग्राम विकास मंडळ लोवले,फटकरे वाडी आणि श्री जय गणेश मित्र मंडळ, दिलीप ‌नामे आणि सहकारी मंडळीने केले आहे. दखल न्यूज महाराष्ट्र

जाहिरात…

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!