प्रतिनिधी : हर्ष नागवेकर
रत्नागिरी : तालुका भंडारी समाज महिला मंडळ यांच्या वतीने रक्षाबंधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाहतूक पोलीस निरीक्षक कार्यालयापासून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली पोलीस बंधु- भगिनींना राख्या बांधून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. यानंतर बाल सुधारगृहातील मुलांना राख्या बांधून खाऊचे वाटप करण्यात आले तेथील लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद विलक्षण होता. यानंतर दिलीप रेडकर संचालीत आशादीप गतिमंद मुलांच्या संस्थेला भेट दिली गेल्या गेल्या तेथील विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजवुन महिला मंडळाचे स्वागत केले त्या सर्वांच्या सोबत रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करुन त्यांना नारळीभात व खाऊ वाटप करण्यात आले .यावेळी संस्थाध्यक्ष दिलीप रेडकर, कर्मचारी वर्ग उपस्थित होते .
या कार्यक्रमाला मंडळाचे
सौ. ज्योती तोडणकर, सौ. आदिती शिरधनकर, संजया कीर, सौ. उर्मिला तळेकर, सौ. राखी भोळे, सौ. स्वाती मयेकर, सौ. नेहाली नागवेकर, सौ. आदिती भाटकर, ॲड. सौ. प्रज्ञा तिवरेकर, रिद्धी तिवरेकर, सिध्दी तिवरेकर, नेहा नागवेकर,अमृता मायनाक, राजीव कीर, कांचन मालगुंडकर, राजेंद्र विलणकर, सौ. रंजना विलणकर, नितीन तळेकर उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.
