चिपळूण : (ओंकार रेळेकर) चिपळूण तालुक्यातील डेरवण येथील वालावलकर रुग्णालय यांच्यामार्फत बुधवारी चिपळूण पोलीस ठाण्यातील अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्यासाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी सहभाग नोंदवून आरोग्य तपासणी करून घेतली बुधवारी खास रक्षाबंधन सणानिमित्त शहरातील परांजपे मोतीवाले हायस्कूलच्या बालविद्यार्थ्यांनी चिपळूण पोलीस स्टेशनला भेट देऊन पोलीस प्रशासनाच्या कामकाजाविषयी माहिती घेऊन कामाचा थोडक्यात आढावा घेतला यावेळी पोलीस प्रशासनातर्फे पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे यांनी मुलांना मार्गदर्शन करून मुलांनी भविष्यकाळात उत्तम दर्जाचे शिक्षण घेऊन सर्व प्रकारच्या व्यसनापासून दूर राहावे असे आवाहन केले यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वालावलकर हॉस्पिटल डेरवण मार्फत चिपळूण पोलीस ठाणे येथील अधिकारी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यांच्याकरिता वैद्यकीय तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले तसेच परांजपे हायस्कूल येथील विद्यार्थिनी ची रक्षाबंधन निमित्त पोलीस ठाणे भेट आयोजित करून त्यांना बिडी सिगरेट तंबाखू यांचे दुष्परिणाम, हायपर टेन्शन, डायबिटीस बाबत डॉक्टरांनी मार्गदर्शन केले उपस्थित विद्यार्थिनींना सायबर सुरक्षा आणि महिला सुरक्षा बाबत पोलिसांनी मार्गदर्शन केले नंतर निर्भया पुस्तिका आणि सायबर सुरक्षा पुस्तिका चे वाटप करण्यात आले. यावेळी चिपळूण पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तसेच परांजपे मोतीवाले हायस्कूल मधील शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.
फोटो : पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना छायाचित्रात दिसत आहेत (छाया : ओंकार रेळेकर). दखल न्यूज महाराष्ट्र.

