बातम्या

चिपळूण तालुका काँग्रेसच्या कार्यालयात राखीपौर्णिमा उत्साहात साजरी.पदाधिकारी-कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

चिपळूण (ओंकार रेळेकर) चिपळूण तालुका काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात आज दुपारी रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुरुष पदाधिकारी-कार्यकर्त्यांना राख्या बांधून हा उत्सव साजरा केला. सर्वांनी एकसंघ राहण्याबरोबरच पक्षही बळकट करूया, असा निर्धार यावेळी करण्यात आला. दरम्यान, या कार्यक्रमानंतर तहसीलदार प्रवीण लोकरे यांनाही महिला काँग्रेसच्या वतीने राखी बांधण्यात आली.
बहीण-भावांमधील प्रेम वृद्धिंगत करणारा, नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ भावबंधाचे रेशीम धागे असेच घट्ट राहोत, याचा शाश्वत आशावाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन. चिपळूण तालुका काँग्रेसच्या संपर्क कार्यालयात आज पक्षाच्या महिलांनी या उत्सवाचे आयोजन केले होते. ज्येष्ठ कार्यकर्त्या रविना गुजर यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. कार्यालयाबाहेर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. तसेच कार्यालयातही आरतीचे ताट आकर्षकपणे सजवण्यात आले होते. यावेळी महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पुरुष पदाधिकारी-कार्यकर्ते यांना राख्या बांधल्या. पक्षाच्या माध्यमातून आपण सारेजण एकसंघ आहोतच, आता या रेशीमबंधाच्या माध्यमातून आपले हे नाते अधिक घट्ट करूया, असा निर्धार यावेळी सर्वांनी केला.
यावेळी रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे प्रवक्ते इब्राहीम दलवाई, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष सुरेश राऊत, ज्येष्ठ नेत्या सुमती जांभेकर, जिल्हा उपाध्यक्ष गौरी रेळेकर, ज्येष्ठ कार्यकर्त्या रविना गुजर, ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश पाथरे, चिपळूण तालुका अल्पसंख्याक सेलचे तालुकाध्यक्ष अन्वर जबले, तालुका उपाध्यक्ष मैनुद्दीन सय्यद, चिपळूण तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष निर्मला जाधव, तालुका सचिव पूर्वा आयरे, तालुका उपाध्यक्ष वर्षा खटके, पेढे ग्रामपंचायतीच्या सदस्या सिद्धी संसारे, नगरसेविका सफा गोठे, महिला काँग्रेसच्या शहर उपाध्यक्ष विणा जावकर, सेवादलचे जिल्हाध्यक्ष टी. डी. पवार, काँग्रेसचे जिल्हा चिटणीस कैसर देसाई, काँग्रेसच्या पर्यावरण विभागाच्या तालुकाध्यक्ष मिलन गुरव, कार्यकर्ते विलास संसारे, युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष साजिद सरगुरोह, कार्यकर्ता संकेत नरळकर आदी उपस्थित होते.

फोटो : चिपळूण काँग्रेस कार्यकर्ते यांच्या वतीने आयोजित रक्षाबंधन कार्यक्रमात उपस्थित पदाधिकारी छायाचित्रात दिसत आहेत(छाया : ओंकार रेळेकर). दखल न्यूज महाराष्ट्र.

जाहिरात

What's your reaction?

Related Posts

1 of 291

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!