लांजा – (प्रमोद तरळ) तालुक्यातील विलवडे रेल्वे स्टेशन येथील रिक्षा व्यावसायिकांना निवारा शेड मिळावी यासाठी भाजप नेत्या व लांजा राजापूर विधानसभा प्रमुख सौ. उल्का यशवंतराव यांनी मुंबई येथे रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली यावेळी संबंधित विभागाला तातडीने सूचना देऊन हा प्रश्न तत्काळ निकालात काढण्याचे आश्वासन मंत्री दानवे यांनी दिल्याचे उल्का यशवंतराव यांनी सांगितले
लांजा तालुक्याच्या पूर्व भागात असलेले विलवडे रेल्वे स्थानक हे लांजा व राजापूर तालुक्यातील प्रवाशांसाठी मध्यवर्ती ठिकाण असल्याने या स्थानकांवर प्रवाशांची नेहमीच गर्दी असते या रेल्वे स्टेशन परिसरात अंदाजे ५० ते ५५ रिक्षा व्यावसायिक रिक्षा व्यवसाय करतात परंतु येथे शेड नसल्याने मोठी गैरसोय होत होती. म्हणून रिक्षा व्यावसायिकांनी भाजपा नेत्या उल्का यशवंतराव यांना निवेदन दिले होते
या रिक्षा व्यावसायिकांची गैरसोय लक्षात घेऊन उल्का यशवंतराव यांनी मुंबईत जाऊन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन विलवडे स्टेशन येथे रिक्षा व्यावसायिकांसाठी निवारा शेड बांधून मिळावी यासाठी पत्र दिले याला सकारात्मक प्रतिसाद देत ना. दानवे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना हा प्रश्न मार्गी त्वरित मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या विलवडे रेल्वे स्टेशन येथे निवारा शेड होण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल रिक्षा व्यावसायिकांनी उल्का यशवंतराव यांचे आभार मानले आहेत. दखल न्यूज महाराष्ट्र.

