मुंबई – (प्रमोद तरळ) कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका गुहागर (मुंबई) यांच्या कार्यकारिणी निवडीची सभा शुक्रवार दि. २५ ऑगस्ट २०२३ रोजी सायं ६.३० वा. गुहागर तालुका पतपेढी कार्यालय, प्रभादेवी (प) मुंबई येथे माजी संघाध्यक्ष राम शिगवण यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जी.बी. पाष्टे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या सभेला ग्रामीण रचने प्रमाणे तवसाळ,पालशेत, हेदवी व गुहागर असे चार गट असून या सभेला चारही गटांचे पदाधिकारी उपस्थित होते
सदर सभेत शाखेच्या पंचवार्षिक कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून शाखेच्या अध्यक्षपदी कॄष्णा वणे तर सरचिटणीसपदी अनंत मालप यांची पुन्हा एकदा एकमताने निवड करण्यात आली
सदर कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी रघुनाथ घुमे (गुहागर गट), सुनिल रांगळे (पालशेत गट), बबनराव कांबळे (हेदवी गट), शांताराम पागडे (तवसाळ गट), सेक्रेटरी अनंत मालप, सहसेक्रेटरी शांताराम आग्रे, सुनिल कुळे, वसंत कावणकर, रामदास गोनबरे, खजिनदार शांताराम रत्नू ठोंबरे, कार्यकारिणी सदस्य रामचंद्र तेलगडे,भरत सोनू भुवड, लक्ष्मण भेकरे,संदीप ठोंबरे, महादेव पाष्टे, सुधाकर झिंबर यांची तर संघ प्रतिनिधी मंडळाचे सदस्य म्हणून रामचंद्र ग. शिगवण, गंगाराम पाष्टे, कॄष्णा वणे, अनंत साटले,माधव कांबळे, रामचंद्र तेलगडे, बबन कांबळे, गिरीश बारस्कर, अनंत मालप आदींची निवड झाली आहे नवनियुक्त पदाधिकारी, कार्यकारिणी सदस्य व संघ प्रतिनिधी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दखल न्यूज महाराष्ट्र
