रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी मधील कार्यकर्ते अनिल करंगुटकर यांची ओबीसी प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल करंगुटकर हे गेली अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीमध्ये कार्यरत आहेत त्यांच्या कामाची दखल घेऊन भाजपाने त्यांना प्रदेश सचिव पदी नियुक्ती केली आहे. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
भारतीय जनता पार्टी कार्यालयाकडून जिल्हाध्यक्ष राजाजी सावंत यांच्या वतीने भाजपा कार्यालय येथे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी स्वप्निल गोठणकर, जिल्हा सरचिटणीस सतीशजी नलावडे आदी उपस्थित होते.