बातम्या

विरोधी पक्षनेते माननीय आमदार विजय भाऊ वडेट्टीवार यांच्या सौजन्याने नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप. ब्रह्मपुरी,चौगान इथे आयोजन करण्यात आले.

प्रतिनिधी : विजय शेडमाके.

ब्रम्हपुरी: शिबिरात नेत्र तज्ञांकडून डोळ्यांची तपासणी करण्यात येत असून ज्यांना दृष्टीदोष आढळून आला अशा गरजूंना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. यावेळी विशेष करून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांचे हस्ते चष्मे वाटपाला सुरुवात करण्यात आली. शिबिराचे उद्घाटन ब्रह्मपुरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष खेमराजजी तिडके यांचे हस्ते सेवा सहकारी संस्था चौगानचे अध्यक्ष तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती दिवाकरजी मातेरे यांचे अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून तालुका काँग्रेस कमिटी सचिव सुरेश दर्वे, ग्राम काँग्रेस कमिटी अध्यक्ष पंकज तिडके, ग्राम काँग्रेस कमिटी नागबोथली अध्यक्ष जगदीश नाकतोडे, ग्राम काँग्रेस कमिटी किन्ही अध्यक्ष पुंडलिक प्रधान, ग्राम काँग्रेस कमिटी चकबोधली अध्यक्ष कमलाकर पारधी, किसान काँग्रेस उपाध्यक्ष श्रीहरी देवगडे, पर्यावरण विभाग सदस्य भगवान प्रधान, किसान काँग्रेस सदस्य शिवाजी नखाते, अनुसूचित जाती सेल सदस्य महादेव फुलझेले, असंघटित कामगार सेल सदस्य रेवंत भुते, माजी अध्यक्ष सेवा सहकारी अनिल पिलारे व व मोठ्या संख्येने ग्रामवासी उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!