सांताक्रूझ – (प्रमोद तरळ) महात्मा गांधी जयंती निमित्ताने व्यसन मुक्ति सप्ताह साजरा केला जातो. हा व्यसनमुक्ती सप्ताह दिनांक २ ऑक्टोबर ते ९ऑक्टोबर २०२३ ला प्रत्येक जिल्ह्यात राबविला जातो. दिनांक ९ ऑक्टोबर २०२३ रोजी सांताक्रुझ विभागात बचत गट महिला मेळावा घेण्यात आला. यामध्ये विभागातील विविध महिला बचत गटाच्या महिलांनी सहभाग घेतला होता.
महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण करण्याचे काम महानगर पालिका करत असते.नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्य व्यसनमुक्ती चा प्रचार, प्रसार आणि प्रबोधनाचे काम करत असते.
व्यसनांच्या आहारी गेलेल्या घरातील पुरुष मंडळींचा सर्वात जास्त त्रास कुटुंबातील महिलेला होत असतो, व्यसनामुळे माणसांना शारीरिक आणि मानसिक परिणामांना सामोरे जावे लागते. नशामुक्त भारत करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना एकत्र आणून आपला परिसर व्यसन मुक्त करण्यासाठी प्रचार, प्रसार आणि प्रबोधन करावे, असे आवाहन महिला मेळाव्याच्या प्रमुख पाहुण्या नशाबंदी मंडळ मुंबई उपनगर जिल्हा संघटक दिशा कळंबे यांनी केले. नशाबंदी मंडळाचे समन्वयक, समाज सुधारक, कायद्याचे विद्यार्थी विवेक साळवी यांनी बचत गटाचे फायदे, व्यवसाय कसा करावा , बचत गटाचा विस्तार कसा करावा, अशा विविध विषयांवर माहिती दिली.
या मेळाव्याला विभागातील “भाग्यलक्ष्मी महिला बचत गट” अध्यक्षा नोविना फर्नांडिस, सिल्व्ही फर्नांडिस,” स्वरूपा महिला बचत गट”
“श्री गणेश महिला बचत गट” सचिव स्नेहा बावकर, महिला अध्यक्षा सुनीता चांदीवडे ( अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ, शाखा वांद्रे,खार,सांताक्रूझ ) सुरेखा चव्हाण, प्रणाली तांबे, मनिषा चोथे, वैदेही साळवी, योगिता गवंडे, संगीता बाईत,मनिषा शिर्के आणि महिला बचत गटाच्या सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दखल न्यूज महाराष्ट्र.
