दिनांक 11 ऑक्टोबर 2023 रोजी कृषी महाविद्यालय डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ अंतर्गत ग्रामीण जागरूकता कार्यानुभव
कार्यक्रम या उपक्रमामध्ये कृषी पुत्र व कृषी रत्न या दोन गटांनी प्रोट्रे पद्धतीने मिरचीची लागवड कशी करावी या विषयावरती प्रात्यक्षिक घेतले. यामध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांनी विकसित केलेली मिरचीची कोकण कीर्ती ही व्हरायटी वापरली गेली होती. यामध्ये सर्व उपस्थित शेतकऱ्यांना प्रॉटरे चा वापर कसा करावा, प्रॉटरे मध्ये माती सोबत अन्य कुठचे घटक मिश्रित करावेत जेणेकरून रोप वाढीसाठी चालना मिळते हे सगळे समजून सांगण्यात आले यासोबतच मिरची लागवडी मध्ये येणारे समस्यांचे निराकरण करण्यात आले व त्यासोबतच मिरची लागवड करताना कोणती काळजी घेणे आवश्यक आहे हे देखील समजून सांगण्यात आले.
या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद सावंत, रावे कार्यक्रम समन्वयक डॉ. विठ्ठल नाईक, केंद्रप्रमुख डॉ.आनंद हणमंते, विषय विशेषज्ञ डॉ. सैतवाल , कार्यक्रमाधिकारी डॉ.सुदेश चव्हाण व कृषी विज्ञान केंद्र(KVK), लांजा आणि डॉ. संदिप कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले. दखल न्यूज महाराष्ट्र.
