उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, यांची प्रमुख उपस्थितीत
विविध कार्यक्रमाचे उदघाटन
प्रतिनिधी/राम भोस्तेकर माणगांव
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे मा. राज्यपाल, तथा विद्यापीठाचे कुलपती यांच्या कार्यालयामार्फत आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ रौप्य महोत्सवी क्रीडा महोत्सवास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, व विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. कारभारी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विविध विकास उपक्रमाचे उदघाटन झाले . यावेळी कुलसचिव डॉ अरविंद किवेलेकर, अधिष्ठाता डॉ.एस एल.नलबलवार डॉ.सचिन पोरे , व इतर मान्यवर, सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
या क्रीडा महोत्सवी भेटी दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, यांनी प्रथम आढावा बैठकीद्वारे विद्यापीठातील सुरु असलेल्या व पूर्ण झालेल्या विविध विकास कामाचा आढावा घेतला. या बैठकी दरम्यान विद्यापीठामार्फत प्रस्तावित विकास कामाच्या सादर केलेल्या रु. ५१८ कोटी रुपयाच्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली मंत्री ना. चंद्रकांत (दादा) पाटील यांनी या प्रस्तावित विकास कामाची वर्षनिहाय विभागणी करून पुढील वर्षाकरिता प्रस्ताव पुनः सादर करण्याचे आदेश दिले. या भेटी दरम्यान विद्यापीठाची पाहणी केली.
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. ना. चंद्रकांत पाटील, विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. कारभारी काळे, राज्यपाल नियुक्त निरीक्षण समितीचे डॉ. शरद बनसोडे, डॉ. मनोज रेड्डी, डॉ. कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विद्यापीठमार्फत नवनिर्माण केलेल्या खो-खो व कबड्डीचे क्रीडांगण, नुतानिकृत सभागृह, १६० क्षमता असलेल्या मुलींच्या वसतिगृहाचे उदघाटन करण्यात आले तसेच कार्यशाळा व मुलींच्या वसतिगृहाचे भूमिपूजन करण्यात आले. या उदघाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. शिवाजी कराड, मुख्य क्रीडा समन्वयक यांनी केले. राज्यपाल नियुक्त निरीक्षण समितीचे अध्यक्ष, डॉ. शरद बनसोडे यांनी क्रीडा महोत्सवाचा आढावा सादर केला व विद्यापीठाच्या आयोजनाबाबत समाधान व्यक्त करून सर्वांचे कौतुक केले. विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. कारभारी काळे यांनी महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ रौप्य महोत्सवी क्रीडा महोत्सव आयोजनाची जबाबदारी विद्यापीठाला दिल्या बाबत राज्यपालाचे आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. ना. चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती दर्शविल्याबाबत ऋण व्यक्त केले तसेच. क्रीडा महोत्सवच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यपाल नियुक्त निरीक्षण समिती, क्रीडा विभागाचे सर्व समन्वयक, खेळाडू तसेच विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी यांनी कटाक्षाने आपली जबाबदारी पार पाडली याबाबत त्यांचे अभिनंदन केले. उद्घाटक व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. ना. चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थ्यांना संबोधतांना सर्व विद्यार्थ्यांनी खेळाडू वृत्ती जोपासावी व चालना देवून येथे राष्ट्रीय स्तरावरचे क्रीडांगण तयार करावे जेणेकरून आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय राज्य व राष्ट्रीय स्तरीय खेळ येथे आयोजित करता येईल. यासाठी आवश्यक ती सर्व मदत राज्य शासन करेल असे आश्वासन दिले. आंतरराष्ट्रीय स्तरावर आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी विद्यापीठ महत्वाची भूमिका बजावेल असे मत याप्रसंगी मंत्री मा. ना.चंद्रकांत पाटील यांनी मांडले.