नाशिक- मनुमानसी सेवाभावी संस्थेतर्फे संस्थापिका सौ.मेघाताई शिंपी तसेच सहकारिणी यांच्याकडुन नवरात्री निमित्त ठिकाण पवार ग्रीन स्पेस नाशिक येथे दिंनाक ६ ऑक्टोबर २०२४ रविवार रोजी विविध क्षेत्रात नावलौकिक करणार्या महिलांचा यथोचित सन्मान करण्यात आला.या नवदुर्गा पुरस्कार कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणुन मा.श्री महेंद्र चव्हाण सर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक)मा.श्री कृष्णा मरकड सर(अभिनेते)मा.सौ संगिता फडोळ मॅडम(स्वराज्य महिला बहुउद्देशीय संस्था),मा.डाॅ. आशाताई पाटील मॅडम (ग्राहक रक्षक समिती अध्यक्षा),मा.सौ. आरती जैन मॅडम (माॅडेल, अभिनेत्री)हे लाभले होते.त्यांनी महिलांना योग्य ते मार्गदर्शन देखील केले.
आजच्या स्त्री ने प्रत्येक संकटाशी कशाप्रकारे झूंज दिली पाहिजे हे महिलांना या कार्यक्रमातुन शिकायला मिळाल.या कार्यक्रमाच सुत्रसंचालन रत्ना चिंतावर ताई,विनया नागरे ताई यांनी केले.पाककला,रांगोळी, श्रावणक्विन,डान्स अशा विविध स्पर्धेंचे आयोजनही या संस्थेतर्फे करण्यात आले होते.सगळ्या महीलांसाठी फराळाची मेजवानी गरमागरम चहाची सोयही करण्यात आलेली होती. कार्यक्रमाचा शेवट बक्षीस वितरणाने करण्यात आला असुन प्रमुख आकर्षण कापसे येवला पैठणी,चंदुकाका सराफ यांची सोन्याची नथ,चांदीचा काॅईन होते.अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम पार पडला. अतिथींकडुन कार्यक्रमाचे भरभरुन कौतुक करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.