जागतिक युवा दिन म्हणजेच स्वामी विवेकानंद जयंती निम्मित खेड जेसीआय मार्फत विविध कार्यक्रमाचे आयोजन १२ ते १८ जानेवारी दरम्यान करण्यात आले होते यामध्ये समाजातील युवकांसाठी काम करणारे खेड मधील युवक आणि मदत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रसाद दिलीप गांधी यांना तरुणांचा आदर्श म्हणून पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले . प्रसाद गांधी हे खेड आणि परिसरात कोणत्याही प्रसागांत कायम मदतीची भूमिका बजावत असतात त्यांच्या असणाऱ्या रुग्णवाहीके मधून रुग्णांना रात्री दिवसा २४ तास सेवा देत असतात त्याच बरोबर समाजसेवा देखील करत असतात म्हणून त्यांना हा पुरस्कार दिला असल्याची माहिती अध्यक्ष जेसी अमर दळवी यांनी दिली .सदर ठिकाणी उपाध्यक्ष स्वप्नील कदम ,जेसी मधुर पेठे ,सेक्रेटरी कपिल कोळेकर , सदस्य जेसी सूरज जोगळे उपस्थित होते .
दखल न्यूज महाराष्ट्र..