रत्नागिरी – भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात परीक्षा विभाग व समुपदेशन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पूर्व समुपदेशन मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेत महाविद्यालयाच्या परीक्षा विभागातील सदस्य विनय कलमकर यांनी विद्यार्थ्यांना सत्र १ परीक्षेची तयारी कशी करावी, परीक्षेचे स्वरूप, परीक्षा काळात ताणतणावा पासून कसे दूर रहायचे याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले.

धनत्रयोदशीच्या व दीपावलीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा..
शुभेच्छुक : श्री. नितीन जाधव.
(भाजपा शहर उपाध्यक्ष रत्नागिरी. प्रभाग क्र.१)
कार्यशाळेला महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ. मधुरा पाटील, उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, विभागातील इतर प्राध्यापक व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते .या समुपदेशन कार्यशाळेचे प्रास्ताविक समुपदेशन विभाग प्रमुख व परीक्षा विभाग प्रमुख सौ.ऋतुजा भोवड यांनी केले. कार्यशाळेचे सूत्रसंचालन राखी साळगावकर यांनी केले तर वैभव कीर यांनी आभार मानले.

शुभेच्छुक : पंकज मारुती पुसाळकर
प्रभाग क्रमांक ७ कार्यकर्ता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.
दखल न्यूज महाराष्ट्र..