रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या कोकण झोन ४ च्या आंतर महाविद्यालयीन व्हॉलिबॉल स्पर्धा नागोठणे येथे नुकत्याच पार पडल्या या स्पर्धेत रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्यामधून २५ महाविद्यालयाचे संघ सहभागी झाले. यावेळी पार पडलेल्या स्पर्धांमध्ये एस पी हेगशेट्ये हाविद्यालयाचा तृतीय वर्ष वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आदित्य साळुंखे याची मुंबई विद्यापीठाच्या संघासाठी निवड करण्यात आली. या वेळी पार पडलेल्या ज्ञानदीप खेड, देवरुख, वेंगुर्ला, बांदा या संघाना पराभूत करत एस पी हेगशेट्ये महाविद्यालयाच्या संघाने सेमी फायनल पर्यंत मजल मारली. महाविद्यालयाच्या संघात आदित्य साळुंखे, अमृत गोरे
मुबीन मापारी, राज चव्हाण दीप प्रभुलकर, आदित्य प्रभुलकर, सिहाब पागारकर आशिष नाईक
यश कदम, बसीर फणसोपकर अमन देसाई. सुयश गिडये हे विद्यार्थी सहभागी झाले.
आदित्य साळुंखे यांची मुंबई विद्यापीठाच्या संघासाठी निवड झाल्याबद्दल नवनिर्माण शिक्षण संस्थेचे चेअरमन अभिजित हेगशेट्ये, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. आशा जगदाळे, संघ व्यवस्थापक प्रा. सुशील साळवी, प्रा. सुकुमार शिंदे, प्रा. डॉ. पूजा मोहिते यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. दखल न्यूज महाराष्ट्र