रत्नागिरी : महाराष्ट्रात भाजपचा संघटनात्मक दौरा सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात संघटनात्मक काम करू. मतदान केंद्रापर्यंत संघटना मजबूत करणार. भारत हा जगातील शक्तीशाली बनवण्याचे काम मोदी सरकार करणार. गरीब कल्याण ते देश कल्याण साठी सरकार प्रयत्नशील आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून रत्नागिरी साठी विशेष प्रयत्न करणार. ज्या लभार्त्याना लाभ मिळाला अशा लभार्त्यांनच्या भावना मोदीजींच्या पर्यंत पोहचाव्या यासाठी धन्यवाद मोदी अभियान राबवण्यात आले. फ्रेंड्स ऑफ बीजेपी अभियान लवकरच सुरू करणार असल्याचे चंद्रकांत बावनकुळे यांनी सांगितले.
युवा वर्गाला युवा वाँरियर्स, युवा योद्धा बनावेत यासाठी व्यासपीठ देणार. मोदी सरकार व राज्य सरकार गतिमान आहे. या आधीचे सरकार फेसबुक लाईव्ह वर भर देत होते. शेतकरी यांच्या बांधावर कधी गेले नाहीत अशी टीका त्यांनी केली. सर्वात निष्क्रिय मुख्यमंत्री असा उल्लेख उद्धव ठाकरे यांचा करावा लागेल. सध्याचे सरकार योजनाबद्ध काम करून विकास साध्य करत आहे. 18 तास काम करणारे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आपल्याला लाभले आहेत. संघटनात्मक काम आमचे सुरु आहे. शिवसेना(शिंदे गट) आणि भाजप एकत्रित काम करेल. लोकसभा आणि विधानसभा आम्ही नक्की जिंकू. रत्नागिरीत संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. विकासासाठी देखील प्रयत्न करणार.
रत्नागिरीत लोकसभा कोण लढवणार हे वरिष्ठ ठरवतील मात्र शिंदे गट भाजप एकत्र लढणार. भाजपा संघटना मजबूत करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार. युवकांना रोजगार मिळाला यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. कोणताही प्रकल्प कोकणातून बाहेर जाणार नाही. भाजपा प्रकल्प होण्यासाठीच प्रयत्न करेल स्थानकीकांचे हित पाहून नागरिकांचे प्रश्न लक्षात घेऊन त्यांना समजवण्यात येईल. बोलायचे एक आणि करायचे एक असे हे सरकार नाही. लोकांच्या मनातील शंका दूर करून प्रकल्प करू.
कोणी कितीही रणशिंग फुंकले तरी त्याचा उपयोग होणार नाही. सरकार होते तेव्हा काहीतरी करण्याची संधी असूनही काही केले नाही. आमदारांना रेडे म्हणणारे यांनीच त्यांना तिकीट दिले होते. मग अत्ता त्यांना रेडे म्हणणे हे त्यांना शोभते का? शिवसेना संपवणे हे राष्ट्रवादीचे काम.
संजय राऊत यांनी सकाळी उठल्यापासून सरकारवर टीका करण्याचे काम करण्यापेक्षा आराम करावा डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. भाजपा शिवसेना असाच जनतेचा कौल होता. महाविकास आघाडी जनतेचा कौल नाही.
महाराष्ट्राची टाचणीभर जमीन सुद्धा कर्नाटकात जाणार नाही हीच सरकारची भूमिका. त्यासाठी देवेंद्रजी आणि शिंदे सक्षम आहेत. असे चंद्रकांत बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
दखल न्यूज महाराष्ट्र.