रत्नागिरी : जिल्हा ग्रंथालय संघातर्फे चालविण्यात येणाऱ्या ग्रंथपालन प्रमाणपत्र परीक्षा २०२२ मध्ये रत्नागिरी केंद्रात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल सौ. अमृता सचिन इंदुलकर (पूर्वाश्रमीच्या अमृता प्रकाश खानविलकर) यांना रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय निरीक्षक योगेश बिर्जे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या सत्काराचे आयोजन रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या ४६व्या अधिवेशनाच्या निमित्ताने ज्ञानदीप वाचनालय, कसबा, संगमेश्वर येथे करण्यात आले होते. सौ. इंदुलकर या सद्गुरु लोकमान्य वाचनालय, देवरुख येथे कार्यरत आहेत.
अधिवेशनातील या सत्काराप्रसंगी व्यासपीठावर आमदार शेखर निकम, माजी जि. प. अध्यक्ष राजेंद्र महाडिक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी अविनाश येवले, ग्रंथालय निरीक्षक योगेश बिर्जे, ग्रंथालय संघाचे अध्यक्ष विश्वनाथ बापट व इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. सौ. इंदुलकर यांच्या यशाचे सद्गुरु लोकमान्य वाचनालयाचे अध्यक्ष प्रा. गजानन जोशी, कार्यवाह राजेंद्र राजवाडे आणि पदाधिकारी, तसेच ग्रंथपाल मेधा आमडेकर आणि इतर सहकाऱ्यांनी अभिनंदन केले.
*फोटो-* अमृता इंदुलकर यांचा सत्कार करताना ग्रंथालय निरीक्षक योगेश बिर्जे, आमदार शेखर निकम आणि उपस्थित मान्यवर.

