रत्नागिरी : तालुक्यातील पालीजवळ दुचाकीवरील ताबा सुटून अपघातात झाला या अपघातात दुचाकी चालकाचा मृत्यू झाला. अपघाताची ही घटना शनिवारी रात्री 8 वा. घडली आहे.
दुचाकी स्वर प्रदीप प्रभाकर धाडवे (25, रा. पाथरट पाली, रत्नागिरी ) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. शनिवारी रात्री तो आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08- एक्स-5222) घेऊन पाली ते रत्नागिरी असा येत होता. तो उभीधोंड येथे आला असता त्याचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने तोल जाऊन खाली पडला. वैद्यकीय सेवा मिळण्यापूर्वीच अपघाताच्या ठिकाणी त्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पाली दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष कांबळे, पोलीस नाईक राकेश तटकरी यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह पाली रुग्णालयात पाठवला.
दखल न्यूज महाराष्ट्र.

▶️ राजस्थान A-1 मार्बल आणि ग्रेनाईट स्वस्त आणि मस्त कोल्हापूर दरात रत्नागिरी येथे उपलब्ध.
👆सेल👆स्वस्त👆सेल👆
🏡🏡🏡🏡
▶️ मार्बल, ग्रेनाईट, हॅण्डीक्राफ्ट, फ्लोअर बाथरूम, किचन टाईल्स, मूर्तीचे भरपूर व्हरायटी
➡️ राजस्थान मार्बल अँड ग्रेनाईट
▶️ स्वप्नातील घर (वास्तू )साकारताना अवश्य भेट द्या..
▶️ रत्नागिरी – कोल्हापूर हायवे, आकाशवाणी केंद्रसमोर, खेडशी, रत्नागिरी
📲 डोनर जैन
📞8209894117
▶️ दखल न्यूज महाराष्ट्र.