रत्नागिरी :- रत्नागिरी जिल्ह्यातील पाली सारख्या गजबजलेल्या बाजारपेठेत जुगार अड्डा चालवला जात आहे हे कळताच पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली बाजारपेठेत बेकायदेशीरपणे जुगार खेळ चालवणाऱ्या विरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश काना कांबळे ( ५७ , रा . हातखंबा बौद्धवाडी , रत्नागिरी ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे . त्याच्या विरोधात सहायक पोलिस फौजदार संतोष कांबळे यांनी तक्रार दिली आहे . त्यानुसार , गुरुवार , ९ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५.४५ वा . ग्रामीण पोलिसांनी पाली बाजारपेठेत धाड टाकली . तेव्हा त्यांना प्रकाश लोकांकडून पैसे स्वीकारत जुगार खेळ चालवत असताना आढळून आला . त्याच्या विरोधात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ ( अ ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
दखल न्यूज महाराष्ट्र.

