रत्नागिरी : महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या अंतर्गत रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या सहकार्याने विद्यालयातील मुलींना स्वसंरक्षणासाठी व त्यांचे
शारीरिक विकासासाठी शाळांमध्ये आत्मरक्षण प्रशिक्षण योजना जिल्हाभरातून राबविण्यात येत आहे सदर योजना अंतर्गत श्री लक्ष्मी केशव माध्यमिक विद्यालय कसोप- फणसोप विद्यालयातील 42 मुलींना 120 तासाचे प्रशिक्षण देण्यात आले सदर प्रशिक्षण दिनांक 21 -2 2023 रोजी उद्घाटन झाले याप्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापिका सौ .नेत्राताई राजे शिर्के मॅडम त्यांच्या हस्ते करण्यात आले सदर प्रशिक्षण पाचवी ते नववी पर्यंतच्या सर्व मुलींना स्वसंरक्षण प्रशिक्षण क्रीडा युवक सेवा संचालनालय प्रमाणपत्र स्वयंसिध्दा प्रशिक्षक श्री राम कररा व महिला प्रशिक्षिका सौ शशीरेखा कररा प्रशिक्षक अमित जाधव तेजकुमार लोखंडे मयुरी कदम यांचे मार्गदर्शन लाभले सदर योजनेचा लाभ घेतलेल्या सर्व मुलींना जिल्हा कार्यक्रम आधिकारी (मा.बा.वि) नयनाताई इंगोले मॅडम व रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन चे अध्यक्ष वेंकटेश्वरराव कररा विद्यालयाचे चेरमन श्री बबनराव साळवी शाळा समिती अध्यक्ष प्रकाश साळवी सचिव रीतेशजी साळवी यांनी शुभेच्छा दिल्या..
दखल न्यूज महाराष्ट्र..
