रत्नागिरी : शहरातील राम आळी भागातील पीठ व मसाला गिरणीच्या बेल्ट मध्ये पाय अडकून गंभीर जखमी झालेल्या गिरण मालकाचा उपचारा दरम्यान अखेर मृत्यू झाला. कोल्हापूर येथे ही घटना घडली.
शहरातील तेली आळी येथे राहणारे अनिल भार्गव पोटफोडे (वय ५७) यांची राम आळी येथे पीठ व मसाला गिरण आहे. शनिवारी सायंकाळी गिरणीमध्ये काम सुरू असताना गिरणीच्या बेल्टमध्ये पाय अडकून ते मशीन मध्ये खेचले गेल्याची घटना घडली होती. यामध्ये त्यांच्या दोन्ही पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने परिसरातील व्यावसायिकांनी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे हलवण्यात आले होते. गंभीर जखमी झालेल्या अनिल पोटफोडे यांचे शनिवारी मध्यरात्री उपचारादरम्यान निधन झाले. आज त्यांचा मृतदेह रत्नागिरीत आणण्यात आला. व्यापारी वर्गात दुःख व्यक्त होत आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.

▶️100 पेक्षा जास्त ऑपरेशन दुर्बिणीद्वारे यशस्वी..
▶️ऑपरेशनमुळे पेशंट पूर्णपणे रोगमुक्त..
▶️कोणताही त्रास न होता पेशंट लगेच फिरू लागल्याने अत्यंत समाधानी..
▶️ 70 वर्षे वयाच्या वृद्ध आजीचे तोंडाच्या कर्करोगाचे ऑपरेशन होऊन रोगमुक्त झाल्या व आनंदी आयुष्य जगत आहेत.
▶️8 वर्ष मूल नसलेल्या जोडप्याला Ovarian drilling व पुढील उपचारामुळे आपत्यप्राप्ती झाली.
▶️हर्नियाच्या अनेक पेशंटना कोणत्याही चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे ऑपरेशन करून खुप फायदा झाला ते समाधानी आहेत.
▶️काही हर्नियाच्या पेशंटचे 3-3 वेळ ऑपरेशन होऊन परत त्रास होऊ लागल्याने दुर्बिणीने ऑपरेशनमुळे व्याधीमुक्त झाले
▶️ गर्भाशयाचा कॅन्सर, ट्युमर यासाठी देखील अनेक शस्त्रक्रिया होऊन पेशंट व्याधीमुक्त झाले.
▶️ बीजकोषाचे ट्युमर सिस्ट यावर उपचार.
▶️ पित्ताशय पित्त खडे दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुसऱ्या दिवशी घरी.
▶️ अवघड अपेंडिक्सच्या शस्त्रक्रिया व इतर अनेक स्तानांचा कर्करोग, आतड्यांचा कर्करोग, अन्ननलिकेचा कर्करोग यावर उपचार शस्त्रक्रिया
▶️ आपल्या मनातील शंका प्रत्यक्ष भेटून दूर करा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका..
▶️ रुग्णांना मोफत सल्ला.
▶️ डॉ. मिहीर चितळे.
चितळे नर्सिंग होम. टिळक आळी रत्नागिरी.
संपर्क : 7263096801.