रत्नागिरी : रत्नागिरीचा सुपुत्र म्हणून ओळखला जाणारा रोहन गुरव दिनांक 1 एप्रिल 2023 मुंबई श्री स्पर्धेमध्ये उपविजेताला ठरला. मुंबई श्री स्पर्धा खेळताना त्याच्यासमोर निलेश दगडे आणि उमेश गुप्ता त्यांचे मोठे आव्हान होते. यामध्ये निलेश दगडे किताब विजेता ठरला.
रोहन गुरव हा तर मुंबईचा रत्नागिरीशी काय नातं. रोहन विजय गुरव यांचे गाव रत्नागिरी मधील गावाखडी गुरववाडी येथे मूळ घर. कामानिमित्त त्याचे वडील विजय गुरव मुंबई येथे कार्यरत झाले. आणि त्या ठिकाणी ते स्थानिक झाले. हे आहे आपल्या रत्नागिरीच्या रोहन गुरवयांचे आपल्या रत्नागिरीशी नातं. रोहन गुरव आज मुंबई मध्ये बॉडी बिल्डिंग मध्ये मोठं नाव केला आहे. 2017 मध्ये रोहनने ज्युनिअर मुंबई, जूनियर महाराष्ट्र, जूनियर इंडिया असे किताब सलग जिंकले आहेत. यावर्षी मुंबई श्री मध्ये रोहन गुरव यांचा बॉडी बिल्डिंग मध्ये मोठा दबदबा निर्माण झाला होता. आणि मुंबई श्री चे प्रमुख दावेदार म्हणून ओळखले जात होते पण आज अभिमानाची गोष्ट आहे आज आपल्या रत्नागिरीच्या रोहन गुरवणे मुंबईमध्ये सुद्धा आपला मुंबई श्री मध्ये मोठं नाव केला आहे बॉडी बिल्डिंग खेळताना त्याच्या घरातल्यांनी त्याच्या गुरूंनी त्याला भरपूर साथ दिली.रत्नागिरीकर म्हणून अभिमानाची गोष्ट आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.
