भारतीय जनता पार्टी दक्षिण जिल्हा अध्यक्ष श्री. राजेशजी सावंत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव, तालुकाध्यक्ष रूपेश कदम, देवरुख शहराध्यक्ष सुशांत मुळ्ये यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा संपन्न.
देवरुख : भारतीय जनता पार्टीच्या शीर्षस्थ नेत्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेऊन आज संगमेश्वर तालुक्यातील मारळ गावचे सुपुत्र तसेच आंबव गावचे रहिवासी श्री. दिनेश गुरव व आंगवलीचे सुपुत्र अक्षय शिंदे यांनी चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणूक प्रमुख प्रमोद अधटराव, तालुकाध्यक्ष रूपेश कदम, देवरुख शहराध्यक्ष सुशांत मुळ्ये, माजी उपनगराध्यक्ष श्री. वैभव कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.
या पक्ष प्रवेशासाठी भाजपा संगमेश्वर (दक्षिण) चे तालुकाध्यक्ष श्री. रूपेश कदम व भाजपा कार्यकर्ते, आंगवली विभागप्रमुख श्री. विजय (बाबू) गुरव यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न केले होते. श्री. दिनेश गुरव आपल्या सह्याद्री कोकण युट्यूब चॅनेलचे सर्वेसर्वा असून सामाजिक कार्यकर्ते म्हणून तालुक्यात प्रसिद्ध आहेत. यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री. नरेंद्र मोदी साहेबांच्या दूरदर्शी नेतृत्त्वात भारताचा अभूतपूर्व विकास होत असून महाराष्ट्रदेखील अत्यंत गतीने बदलतोय. यामुळे स्वाभाविकपणे भाजपच्या माध्यमातून सामाजिक कार्य करणे सोयीचे ठरणार असून त्यातून लोककल्याणाचा आनंद प्राप्त होणार आहे. यासाठीच आज मा. प्रमोद अधटराव यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रवेश केला आहे. संघटनेचे काम प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडतानाच अधिकाधिक युवा वर्गाशी संपर्क साधून त्यांना भाजपाची ध्येयधोरणे समजावून सांगत भाजपामध्ये प्रवेश करण्यास प्रवृत्त करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी सोशल मिडिया जिल्हा संयोजक श्री. अमोल गायकर, तालुका संयोजक श्री. मंगेश गोताड, युवा कार्यकर्ते प्रथमेश धामणस्कर, श्री. स्वप्निल (बंटी) शिंदे, श्री. सुनील गोपाळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र.
