टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया आणि टेनिस क्रिकेट असोसिएशन महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमानाने 02 डिसेंबर ते 05 डिसेंबर 2023 रोजी नाशिक येथे 5 वी सतरा वर्षातील राष्ट्रस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी धाराशिव येथे झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेमधून रत्नागिरीतील ऋषिकेश इंदुलकर (लांजा), करण पड्यार (लांजा), अभिषेक पड्यार (लांजा) आणि अर्ष हरीचकर (देवरुख) यांची निवड महाराष्ट्र आणि मुंबई संघांमध्ये झाली आहे. अशी माहिती क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी अध्यक्ष सुमित अनेराव, सचिव सिद्धेश गुरव सर यांनी दिली. तसेच रोशन किरडवकर सर यांनी सर्व मुलांना उत्तम मार्गदर्शन केले.तसेच जिल्ह्यातून निवड झालेल्या मुलांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन केले जात आहे.
ही राष्ट्रस्तरीय स्पर्धा टेनिस क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया अध्यक्ष कन्हैया गुज्जर सर, भारतीय सचिव आणि महाराष्ट्र सचिव सौ. मीनाक्षी विलास गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.