बातम्या

वितरकांनी कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर फेडरेशनशी संलग्न होऊन सुरक्षितता साधावी- अन्वरशेठ मेमन..

रत्नागिरी : जिल्ह्यातील वितरकांच्या सुरक्षिततेसाठी आणि व्यावसायिक सुसूत्रतेसाठी वितरकांनी कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर फेडरेशन (CPDF) यांच्याशी संलग्न होणे अत्यावश्यक आहे असे प्रतिपादन फेडरेशन चे अध्यक्ष अन्वरशेठ मेमन यांनी केले.
प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर फेडरेशन ची बैठक नुकतीच शहरातील व्यंकटेश हॉटेलच्या सभागृहात संपन्न झाली. यावेळी सभासदांच्या कार्यान्विततेनुसार फोरमची कोअर कमिटी पुन्हा एकदा बनवण्यात आली. अध्यक्षपदी रत्नागिरी जिल्ह्यातील ज्येष्ठ व्यावसायिक श्री अन्वर मेमन काम पहात असून सेक्रेटरी म्हणून श्री तुषार मलूष्टे व खजिनदार श्री श्रीकांत पंडीत काम पहात आहेत. सभेची सुरुवात ICICI बँक मॅनेजर श्री अमित तांबट यांचे स्वागत करून झाली श्री तांबट यांनी बँकेच्या विविध स्कीम विषयक माहिती दिली. हिशोब वाचन व काही विषयांना मंजुरी मिळाल्यानंतर नाशिक येथे राज्य फेडरेशनच्या झालेल्या अधिवेशनात लॉन्च करण्यात आलेल्या वितरक अँपबद्दल माहिती देण्यात आली. फेडरेशनने लॉन्च केलेले वितरक अँप हे वितरकांच्या सर्वांगीण सुरक्षिततेसाठी बनवण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील वितरकांनी फेडरेशनमध्ये सहभागी होऊन आपल्या व्यवसाय सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे असे आवाहन रत्नागिरी कन्झ्युमर प्रॉडक्ट डिस्ट्रिब्युटर फेडरेशन तर्फे अध्यक्ष अन्वर मेमन यांनी यावेळी केले.
अजूनही रत्नागिरी मधील जे वितरक संघटनेमध्ये सभासद झाले नाहीत त्यांनी लवकरात लवकर सभासद व्हावे अधिक माहितीसाठी सेक्रेटरी श्री तुषारशेठ मालुष्टे यांच्याशी 7720979933 या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन अध्यक्ष श्री अन्वरशेठ मेमन यांनी केले आहे.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!