चिपळूण : महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची संस्थापक अध्यक्ष राहुल दुबाले यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण प्रमुख सैफ सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच (खेर्डी, चिपळूण) येथे बैठक झाली. या बैठकीत संघटना वाढीसाठी महत्त्वपूर्ण चर्चा झाली. तसेच १३ नोव्हेंबर रोजी शिर्डी येथे होणाऱ्या संघटनेच्या राज्यस्तरीय बैठकीत बाबत नियोजन करण्यात आले.या बैठकीला खेर्डीतील युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. युवकांनी संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त करीत आम्ही संघटनेसाठी काम करू व पोलिसांना सहकार्य करू अशी ग्वाही दिली.तसेच सैफ सुर्वे यांनी १३ नोव्हेंबर रोजी शिर्डीत संघटनेची पोलीस परिवार अस्तित्व राज्यस्तरीय बैठक होणार आहे. या बैठकीत पोलीस परिवार यांच्यासाठी शिक्षण, संरक्षण, रोजगार, आरोग्य आणि निवारा या पाच मूलभूत घटकांवर चर्चा होणार असल्याची सेफ सुर्वे यांनी सांगितले.यावेळी महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे कोकण प्रमुख सैफ सुर्वे, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष समीर कदम, युवक आघाडी जिल्हाध्यक्ष आतिफ गोठे, गोरा कुंभार समाज विकास मंडळाचे तालुका अध्यक्ष प्रकाश साळवी, युवा आघाडी उपाध्यक्ष दिनेश गुडेकर आदी, दिनेश व्हाळकर, शेखर खांबे आदी उपस्थित होते. दखल न्यूज महाराष्ट्र..
- Home
- महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेची खेर्डीत बैठक; शिर्डी येथे होणाऱ्या राज्यस्तरीय बैठकीबाबत नियोजनाबाबत चर्चा