रत्नागिरी- भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या सात दिवसीय श्रमसंस्कार निवासी शिबीरात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने खेडशी गावातील ग्रामस्थ तसेच राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या स्वयंसेवकांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन केले होते. आरोग्य तपासणीमध्ये रक्त तपासणी, ब्लड प्रेशर आणि नेत्र तपासणी यांचा समावेश होता. गावातील ग्रामस्थांनी मोफत आरोग्य तपासणी शिबीराचा लाभ घेतला. तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालय येथील डॉ. अमर्जीत चव्हाण डॉ. प्रनोती काशिद, डॉ. स्वप्नील भोसले, समुपदेशक राम चिंचोले, रामेश्वर म्हेत्रे, प्राची जाधव, सामजिक कार्यकर्त्या श्वेता चव्हाण, हिंद लॅब जिल्हा समन्वयक श्वेता शिंदे, लॅब टेक्निशियन कोमल पाटील, लॅब समन्वयक हिंद लॅब शुभम पवार आणि नेत्राचिकित्सक निकिता नाचणकर उपस्थित होते. यावेळी खेडशी गावच्या सरपंच सौ. जान्हवी घाणेकर, खेडशी हायस्कूलचे शिक्षक सुभाष पाटील, राष्ट्रीय सेवा योजना प्रकल्पाधिकारी प्रा.हरेश केळकर, सहाय्यक प्रकल्पाधिकारी सौ. ऋतुजा भोवड, प्राध्यापक, स्वयंसेवक आदी उपस्थित होते.
- Home
- खेडशी गावातील ग्रामस्थांनी घेतला मोफत आरोग्य तपासणीचा लाभ..