रायगड : ExxonMobil या मोठ्या प्रकल्पाच्या माध्यमातून ९०० कोटींची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पामुळे हजारोंच्या संख्येने रोजगार उपलब्ध होणार आहे. ExxonMobil ने सांगितले की ते रायगडमधील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या इसांबे औद्योगिक क्षेत्रात ल्युब्रिकंट्स उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी जवळपास 900 कोटी रुपयांची (USD$110 दशलक्ष) गुंतवणूक करत आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्योगमंत्री उदय सामंत आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कंपनीने ही घोषणा केली.
उत्पादन, पोलाद, उर्जा, खाणकाम आणि बांधकाम, तसेच प्रवासी आणि व्यावसायिक वाहन विभागातील औद्योगिक क्षेत्रांमधील वाढत्या देशांतर्गत मागणीची पूर्तता करण्यासाठी वार्षिक 159, 000 किलोलिटर ल्युब्रिकंट्स तयार करण्याची क्षमता या प्लांटमध्ये असेल, अशी माहिती ExxonMobil ने दिली आहे. याचे काम 2025 च्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे. “आमच्या पहिल्या ग्रीनफिल्ड गुंतवणुकीबरोबर भारताप्रती असलेली आमची दीर्घकालीन वचनबद्धता अधिक दृढ करण्याचा आम्हाला अभिमान वाटतो; आकर्षक गुंतवणुकीच्या वातावरणामुळे महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे उत्पादन केंद्र आहे आणि आमच्या ल्युब्रिकंट्स प्लांटसाठी नैसर्गिक उत्तम पर्याय आहे”, असे भारतातील ExxonMobil च्या संलग्न कंपन्यांचे प्रमुख कंट्री व्यवस्थापक मॉन्टे डॉब्सन म्हणाले.
तसेच “मेक इन इंडिया” उपक्रमाला महत्त्वपूर्ण चालना देण्यासाठी, प्लांट बेस स्टॉक, अॅडिटीव्ह आणि सर्व पॅकेजिंगचा मोठा भाग स्थानिक पातळीवर उपलब्ध करून देण्यात देईल. बांधकामाच्या टप्प्यात सुमारे 1,200 नोकऱ्या निर्माण होण्याची अपेक्षा आहे. “भारतातील उच्च-कार्यक्षमता ल्युब्रिकंट्स पुरवठादारांपैकी एक म्हणून आमचे स्थान मजबूत करण्याच्या दिशेने हे एक बदलाचे आणि महत्त्वाचे पाऊल आहे; स्थानिक पातळीवर उत्पादन केल्याने आमची पुरवठा साखळी सुलभ होईल, ज्यामुळे आम्हाला आमच्या भारतीय ग्राहकांच्या आणि उपभोक्त्यांच्या गरजा अधिक सहजतेने पूर्ण करता येतील. भारताच्या विस्ताराच्या कथेला पाठिंबा देण्याच्या आमच्या वाढत्या भूमिकेबद्दल आम्ही उत्साहित आहोत,” असे ExxonMobil Lubricants Pvt. Ltd. चे सीईओ विपिन राणा म्हणाले.
ल्युब्रिकंट्स तंत्रज्ञानातील जगातील अग्रगण्य ब्रँड म्हणून, ExxonMobil ची Mobil-ब्रँडेड इंजिन ऑईल, ग्रीस आणि ल्युब्रिकंट्स यांची विस्तृत श्रेणी अनेक दशकांपासून भारताच्या ऑटोमोटिव्ह आणि औद्योगिक क्षेत्रांसाठी ऊर्जा कार्यक्षमता, उत्पादकता आणि टिकाऊपणा वाढवत आहे. कंपनी भारताचा द्रवीभूत नैसर्गिक वायूचा एक प्रमुख पुरवठादार देखील आहे.
दखल न्यूज महाराष्ट्र.
