AS ADVISORY SERVICES पुरस्कृत टेनिस क्रिकेट असोसिएशन लांजा आणि शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना लांजा तालुका यांच्या संयुक्त विद्यमानाने 17 वर्षातील लांजा तालुकास्तरीय टेनिस क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धा 2024 लांजा येथील नारकर पटांगणावरती 3 ते 4 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडली. या स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती म्हणून AS ADVISORY SERVICES चे मालक श्री. अमोल पळसमकर साहेब आणि सौ. संचिता खानविलकर मॅडम, शिक्षणाधिकारी जि. प. रत्नागिरी मा. सुनीता शिरभाते मॅडम, गटशिक्षणाधिकारी पं. स. लांजा श्री विजयकुमार बंडगर साहेब, केंद्रप्रमुख लांजा तालुका श्री. चंद्रकांत पावसकर साहेब, लांजा तालुका शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना अध्यक्ष श्री निलेश बागडे सर, लांजातील प्रसिद्ध उद्योजक श्री विजय जी नारकर साहेब, विनोद सावंत साहेब, समालोचक सुनील मोर्ये साहेब, मुचकुंदी परिसर विकास संघटना उपाध्यक्ष गणेश जी खानविलकर साहेब,लांजा तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक श्री महादेवराव खानविलकर, गोळवशी गावचे पोलिस पाटील महेश वीर साहेब,
संदेश गुरव, संकेत गुरव, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, क्रीडाशिक्षक, मार्गदर्शक तसेच लांजा तालुक्यातील सर्व क्रीडाप्रेमी आणि मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघानी भाग घेतला होता. त्यामधून तु. पुं. शेट्टे लांजा हायस्कूल या शाळेने या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला, अथर्व सुर्वे उत्कृष्ट गोलंदाज तर मालिकावीर वेदांत सावंत यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले, द्वितीय क्रमांकाचा मान पुनस हायस्कूल ने पटकावला त्यामधील श्रेयस पांचाळ याला उत्कृष्ट गोलंदाज म्हणून चषक देऊन सन्मानित करण्यात आले.
या स्पर्धेचं आयोजन टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरी सचिव कोल्हापूर विभाग अध्यक्ष सिद्धेश शिवाजी गुरव, आदर्श विद्यामंदिर देवधे मुख्याध्यापक श्री. सुशांत राईन सर, श्री. किरण गुरव साहेब, श्री. गजानन गुरव गुरव ज्ञाती समाज लांजा तालुका अध्यक्ष, श्री. प्रकाश गुरव, श्री. मारुती गुरव, श्री. रमाकांत कांबळे साहेब, श्री. सागर भारती साहेब, श्री दिलीप दिवाळी गुरुजी,
श्री दिनेश झोरे साहेब, श्री अनिकेत गुरव सर, श्री योगेश खावडकर साहेब, अक्षय झीमन चिंतामणी स्पोर्ट्स चे मालक, पंच म्हणून कामगिरी पाहणारे रोशन किरडकर सर आणि अक्षय पिलके सर यांच्या सहकार्यातून ही स्पर्धा संपन्न झाली.