रत्नागिरी : दिनांक ३ व ४ फेब्रुवारी, रोजी, भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या, श्रीमती शलाकाताई साळवी यांचा दोन दिवसीय रत्नागिरी जिल्हा प्रवास संपन्न झाला. भाजपा महिला मोर्चा, रत्नागिरी दक्षिणच्या जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता ताई साळवी, यांनी या जिल्हा प्रवासाची नियोजनपूर्वक आखणी केली होती. या दोन दिवसीय प्रवासा अंतर्गत त्यांनी जिल्ह्यातील तीनही विधानसभा क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या विविध स्थळांना भेट दिली आणि तेथील मान्यवरांशी संवाद साधला. त्यांच्या दोन दिवसीय “जिल्हा संपर्क प्रवास” अंतर्गत, विविध कार्यक्रमांची एकूण उपस्थिती ७०० हून अधिक होती. ह्या प्रवासा दरम्यान शलाका ताईंनी त्यांच्या ४२ वर्षाचा पक्ष कार्याचा प्रवास सांगितला. सन १९८३ पासून त्या पक्षाच्या कार्यामध्ये सहभागी आहेत. वेळोवेळी विविध पदांवर जबाबदारी पार पाडून त्या आता राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या आहेत. विविध राज्यांच्या निवडणुकांमध्ये केंद्रा तर्फे त्यांची नेमणूक झाली होती. त्यांच्या सोबत प्रवासामध्ये त्यांचा साधेपणा, समंजसपणा, आपलेपणा, सर्वांशी जुळवून घेणे,सर्वांना सोबत घेणे, माणसं जपायची वृत्ती असे अष्टपैलू गुण खरोखरच वाखण्या जोगे आहेत.
. संघ परिवाराशी बोलताना त्या म्हणाल्या,”राजकारणातील नव्या पिढीने ज्येष्ठ कार्यकर्त्यां कडून पक्षनिष्ठा, प्रतिकूल परिस्थतीतही खंबीर पणे कार्यरत राहणे, असे गुण घेऊन, आपल्या नव्या शक्तीचा, तंत्रन्यानाचा आणि ज्येष्ठांच्या अनुभवाचा समतोल राखून काम करावे. भाजपा हा अखंड परिवार आहे आणि तो तसाच रहावा या साठी सर्वांनी योगदान द्यावे. श्री. नरेंद्र मोदीजी हे ४५ वर्षे राजकीय तपस्या केलेले महापुरुष आपल्याला पंतप्रधान म्हणून लाभले आहेत. हे आपले भाग्य.”
ह्या दोन दिवसीय कार्यक्रमाचा समारोप करताना सौ. सुजाता ताई साळवी, जिल्हाध्यक्षा भाजपा महिला मोर्चा रत्नागिरी दक्षिण या त्यांचे आभार मानताना म्हणाल्या, “शलाका ताईंनी दोन दिवसीय प्रवासा साठी आपला अमूल्य वेळ दिला, ह्या बद्दल त्यांचे आभार.
त्यांचा अनुभवातून खूप काही शिकण्यासारखं आहे. पूर्वीच्या पक्ष सहकारी यांच्या सोबत त्यांनी आजही जपलेले दृढ नाते, हे नवीन पिढीने शिकण्यासारखे आहे. आज भारताचे लोकप्रिय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी, यांच्या योगदान मुळे भारत हा विकसित राष्ट्राच्या पथावर अग्रेसर पणे वाटचाल करत आहे. भारतातील सर्वात मोठ्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून आम्ही देखील आमचे शत प्रतिशत योगदान देऊ. प्रभू श्री राम ह्यांना जसे सेतू बांधताना खारूताईंनी मदत केली होती. तसेच आम्ही, भाजपा महिला मोर्चा, रत्नागिरी दक्षिण च्या कार्यकर्त्या म्हणून वचन देतो की आम्ही ही मोदींच्या कार्यात खारुताई बनून विकसित भारत राष्ट्राच्या कार्यात आमचा सहभाग ठेवू.” ह्या प्रवासा अंतर्गत, श्रीमती शलाका ताई साळवी यांच्या सोबत प्रवास सहकारी म्हणून भाजपा महिला मोर्चा, रत्नागिरी दक्षिण च्या, या मान्यवर आणि पदाधिकारी सोबत होत्या. सौ. सुजाता ताई साळवी मॅडम, जिल्हाध्यक्षा, सौ. शिल्पा मराठे,
प्रदेश सचिव, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा संयोजिका, सौ. दीपलक्ष्मी पडते, रत्नागिरी जिल्हा समन्वयक, सौ. अपर्णा पाटील, रत्नागिरी जिल्हा समन्वयक, सौ. नूपुरा मुळ्ये, जिल्हा सरचिटणीस, वर्षा राजे निंबाळकर,
जिल्हा उपाध्यक्षा, जिल्हा सोशल मिडिया संयोजिका, शक्ती केंद्र प्रमुख , श्रीमती शलाका ताई साळवी,आदी.