विविध ठिकाणी समाजनेत्यांच्या भेटी- गाठी
विक्रमगड – (प्रमोद तरळ) शनिवार दि. ३ फेब्रुवारी व ४ फेब्रुवारी २०२४ रोज़ी विक्रमगड येथील व्ही. जी .पाटील साहेब यांच्या रिसोर्टवर संघाध्यक्ष भूषणजी बरे यांच्या अध्यक्षतेख़ाली मराठा समाजाला कुणबी समाजाचे दाखले देऊन OBC आरक्षणात वाटेकरी करुण कुणबी समाजाच्या भावी पीढ़ीला उद्गवस्त करण्याचे काम हे सरकार करत आहे त्याविरुद्ध आवाज उठविणयासाठी समाजात जनजागृती करुण संघर्ष करणे . त्याच बरोबर इतर सामाजिक विषयावर प्रदीर्घ काळ चिंतन करण्यात आली
सदर प्रसंगी राजकीय संघटन समिती अध्यक्ष तथा बळीराज सेना पक्षाध्यक्ष- अशोकदादा वालम, माज़ी अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री:- भालचंद्र ठाकरे व्ही . जी . पाटील, अशोक करंजे, हरिश्चंद्र पाटील, संघ सहसचिव , कृष्णा कोबनाक , कार्याध्यक्ष, [नंदकुमार मोहिते, प्रकाश तरळ, संभाजी काजरेकर { सरचिटणीस} ] , राजाराम ढोलम, ठाणे, प्रकाश चांदीवडे, अनिल मोंडे,(पनवेल)राजेंद्र जोशी – मनोहर पवार, संदीप गावड़े, डॉ- प्रकाश भांगरथ, सुरेश पास्टे, मधुकर शिंदे, कुमार वेखंडे, तुषार देसले, उदयोजक निलेश भोईर, संजय चव्हाण आदी मंडळी उपस्थित होते.
याप्रसंगी माजी अतिरिक्त जिल्हाधिकारी भालचंद्र ठाकरे, व्ही जी पाटील, निलेश सांबरे, डॉ :- प्रकाश भांगरथ, विश्वनाथ पाटील, नीलेश भोईर यांना आणि त्यांच्या संपर्कातील विविध कुणबी संस्थाचे प्रमुख यांना शनिवार दि. १० फेब्रुवारी २०२४ रोज़ी दादर येथिल देवराज हाँल , दादर पश्चिम येथे संघाने आयोजित केलेल्या सभेसाठी आमंत्रण दिले.