बातम्या

वर्गमित्राच्या कुटुंबासाठी वर्गमित्र एकवटले..

राजापूर – (प्रमोद तरळ) तालुक्यातील ज्युनिअर कॉलेज ओणी- राजापूर मधील २००३-०४ वर्षांतील बॅच काही दिवसांपूर्वी वीस वर्षांनंतर एकत्र येऊन काही उपक्रम हाती घेतले. त्यापैकी त्यांचा एक सामाजिक उपक्रम नुकताच पार पडला,
सदर वर्गातील वर्गमित्र ओणी गावातील कै.शिवाजी मांडवकर यांचं काही महिन्यांपूर्वी अचानक निधन झालं, त्यांच्या पाठीमागे त्याची पत्नी आणि तीन लहान मुले आपला संघर्ष करत जीवन जगत असताना त्यांच्या संघर्षाला हलकं करण्यासाठी सगळे वर्गमित्र-मैत्रिणी एकत्र येऊन गेले दोन महिने नियोजन आणि मेहनत करून एक छोटीशी मदत ऊभी करुन सदर कुटुंबास सुपूर्द करण्यात आली, मदत सुपूर्द करताना त्या लहान मुलांच्या चेहऱ्यावर आलेलं कोवळं हसू बघून भविष्यात अजून काही चांगलं काम करण्याचं बळ मिळणार आहे असा विश्वास वर्गमित्रांनी व्यक्त केला.

What's your reaction?

Related Posts

1 of 295

Leave A Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!