रत्नागिरी :- तालुक्यातील तरवळ- जाकादेवी येथील वृद्धाने मद्याच्या नशेत आंबा फवारणीचे औषध प्राशन केले . उपचारासाठी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिकाजी गंगाराम कुळये ( वय ६५ , रा . तरवळ – जाकादेवी , रत्नागिरी ) असे मृत वृद्धाचे नाव आहे . ही घटना शुक्रवारी ( ता . २३ ) सकाळी अकराच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली . कुळ्ये यांनी सोमवारी ( ता . १९ ) मद्याच्या नशेत आंबा फवारणीचे औषध प्राशन केले . अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . उपचार दरम्यान त्यांचा शुक्रवारी मृत्यू झाला . ग्रामीण पोलिस स्थानकात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दखल न्यूज महाराष्ट्र